‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हात, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 04:50 PM2019-07-28T16:50:33+5:302019-07-30T20:04:01+5:30

ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’, ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले.

Hand over help to 'Signals School' and 'Old House', Pushkar Shotri, Vishakha Subedar | ‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हात, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान

‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हात, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हातपुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’, ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य

ठाणे :  सिग्नल वरील वंचित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या ‘समर्थ भारत व्यासपीठ’ व वृद्धांना मायेची सावली देणाऱ्या ‘श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ’ या सामाजिक संस्थांच्या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला. व्यावसायिक सामजिक दायित्वच्या (सिएसआर) माध्यमातून एसबीआय लाईफ इन्शुरन्स तर्फे या दोन्ही संस्थांना मदतीचा हात पुढे करत धनादेश सुपूर्द करण्यात आला. 

        यावेळी पर पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी  समर्थ भारत व्यासपीठ चे कार्यकारी अधिकारी भटू सावंत, अक्कलकोट सेवा मंडळाचे अध्यक्ष चिंतामणी रहातेकर, मराठी चित्रपट अभिनेते पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री विशाखा सुभेदार, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे अध्यक्ष आनंद पेजावर,एसबीआय लाइफचे प्रेम विद्यार्थी आदी मान्यव कर्मचारी उपस्थित होते. या सहयोगाद्वारे, श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ येथे एकूण वीजबिलात जवळजवळ ८० टक्के बचत करण्यास मदत करणारी ‘ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’ उभारण्यासाठी आणि समर्थ भारत व्यासपीठतर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘सिग्नल स्कूल’च्या ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. या उपक्रमाविषयी बोलताना अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी या दोन्ही संस्थांच्या सामाजिक कर्यासंबंधी गौरवोद्गार काढले. तसेच या समाजातील वंचित मुले व वृद्ध माय बाप यांना दयेची नाही तर मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे अशी आशही श्रोत्री यांनी व्यक्त केली. यावेळी आनंज पेजावर यांनी  वयस्कर व्यक्ती व रस्त्यावर राहणारी मुले यांना उत्तम जीवन देण्यासाठी श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ व समर्थ भारत व्यासपीठ यांनी दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केले.
समर्थ भारत

‘सिग्नल शाळा’ ‘समर्थ भारत व्यासपीठ’ने सुरू केलेली नावीन्यपूर्ण संकल्पना असून, तिचे उद्दिष्ट काम करणाऱ्या व रस्त्यावर राहणाऱ्या वंचित व गरजू बालकांना पारंपरिक शिक्षण देणे, हे आहे. याव्यतिरिक्त, हा ट्रस्ट बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, इंग्रजी बोलण्याचे विशेष वर्ग, पोषक आहार, समुपदेशन यांचे आयोजन करतो. http://signalshala.in/

श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ:

श्री अक्कलकोटस्वामी सेवा मंडळ 2009 पासून आपल्या ‘अन्नछत्र’मध्ये (जे रोज संध्याकाळी आदिवासी मुलांना मोफक पोषक अन्न देते) आणि ‘वृद्धाश्रम’मध्ये (वृद्धाश्रम) बालके व ज्येष्ठ नागरिक यांना सेवा देत आहे. वृद्धाश्रमामध्ये 60 ते 87 वर्षे वयोगटातील 11 ते 12 ज्येष्ठ नागरिक आहेत. http://swamidhamsamarth.org/index.html

Web Title: Hand over help to 'Signals School' and 'Old House', Pushkar Shotri, Vishakha Subedar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.