Hammer at the former councilor's office | माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर हातोडा
माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर हातोडा

भिवंडी : महापालिका क्षेत्रातील कासारआळी येथील सर्वोदय सोसायटीच्या पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करून माजी नगरसेवक महेश कृष्णा जगताप याने उभारलेले भव्य कार्यालय न्यायालयाच्या आदेशावरून रविवारी जमीनदोस्त करण्यात आले.

जगताप यांनी कासारआळी येथील सर्वोदय नागरी सोसायटीच्या पार्किंगच्या मोकळ्या जागेवर अतिक्र मण करून २८ हजार ३३५ या मोजमापाचे संपर्ककार्यालय उभारले होते. या अवैध कार्यालयाविरोधात सोसायटीचे अध्यक्ष विनोद गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने हे अवैध बांधकाम तोडून सोसायटीची जागा मोकळी करून देण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची दखल घेऊन पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी प्रशासनाला अवैध बांधकाम निष्कासित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सहायक आयुक्त सोमनाथ सोष्टे, बाळाराम जाधव, शमीम अन्सारी, सुदाम जाधव, सुनील भोईर आदींनी अतिक्र मण पथकाचे कर्मचारी व जेसीबी मशीनच्या साहाय्याने बेकायदा कार्यालय पाडले आहे. यावेळी घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पालिकेच्या खाजगी सुरक्षा यंत्रणेचा फौजफाटा तैनात होता.

Web Title: Hammer at the former councilor's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.