अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा

By Admin | Updated: May 14, 2016 00:57 IST2016-05-14T00:57:17+5:302016-05-14T00:57:17+5:30

दोन दिवसांपासून केडीएमसीची रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू असून या कारवाईअंतर्गत अ, ब, क, ह प्रभाग क्षेत्रांतील बांधकामे तोडण्यात आली.

Hammer on the construction blocks | अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा

अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर हातोडा

कल्याण : दोन दिवसांपासून केडीएमसीची रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू असून या कारवाईअंतर्गत अ, ब, क, ह प्रभाग क्षेत्रांतील बांधकामे तोडण्यात आली. शुक्रवारी संतोषीमाता मंदिर रोड परिसरातील तेजश्री बिल्डिंगजवळील तळ अधिक एक मजली प्रीतम आणि ताकवणे सदन ही दुमजली इमारत ‘ब’ प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रभाकर पवार यांच्या पथकाकडून तोडण्यात आली. या इमारती ३५ वर्षे जुन्या होत्या आणि रस्ता रुंदीकरणात बाधित ठरत होत्या.
पोकलेन, जेसीबी आणि महापालिकेच्या १५ पंधरा कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने त्या तोडण्यात आल्या. या वेळी अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुनहल पाटील, ड प्रभाग अधिकारी शांतिलाल राठोड आणि कार्यकारी अभियंता दहपक भोसले उपस्थित होते. क प्रभाग क्षेत्र अधिकारी अरुण वानखेडे यांच्या पथकाने काळातलाव, काळी मशीद रोडवरील चार घरे तोडली. तर, गुरुवारी डोंबिवली पश्चिम येथील श्रीधर म्हात्रे चौक ते सुभाष रोड रस्ता १५ मीटर रुंद रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या १३ बांधकामांवर प्रभाग क्षेत्र अधिकारी ह पराशुराम कुमावत, फ प्रभाग अधिकारी भरत जाधव यांनी कारवाई केली. तसेच ब प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत चिकणघर परिसरातील लॉर्ड शिवा पॅरेडाइज ते मंगेशी रोडलगत असलेला बंगला तोडण्यात आला. (प्रतिनिधी)गुरुवारी कळव्यातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा टाकल्यानंतर शुक्रवारीदेखील महापालिकेची ही कारवाई सुरूच होती. दिवसभरात तब्बल २२५ बांधकामांवर पालिकेने हातोडा टाकला. सकाळी कळवा चौकातून या कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईमध्ये कळवा सुपर मार्केट, घड्याळ चौक, आईनगर, बुधाजीनगर, रमाबाई चौक, राणा टॉवर, गांधीनगर, कळवा स्टेशन रोड, कळवा भाजी मार्केट ते परत कळवा चौक या परिसरात जोरदार कारवाई करून जवळपास २२५ अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त (२) अशोककुमार रणखांब यांच्या अधिपत्याखाली उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, सहायक आयुक्त शंकर पाटोळे, सागर घोलप यांनी पोलीस बंदोबस्तात पार पाडली.

Web Title: Hammer on the construction blocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.