शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच झालं, जिम चालकांच पुनश्च: हरी ओम कधी होणार?; शिष्टमंडळ मनसे आमदाराला भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 17:57 IST

कल्याण - डोंबिवली मध्ये सर्वाधिक जिम मालक हे मराठी आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या नियमांचे पालन करत त्यांनी जवळपास आता 5 महिने जिम बंद ठेवल्या होत्या. मात्र आता कल्याण डोंबिवली मधील व्यापाऱ्यांची दुकान तसेच मार्केट सूरु झाली आहेत.

डोंबिवली :  कल्याण डोंबिवली महापालिकेने बाजारपेठेतील दुकाने,मार्केट सुरू करण्यास नियम व अटीं आखून व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्याच धर्तीवर जिम सुरू करण्यास देखील परवानगी द्यावी यासाठी डोंबिवली जिम ऑनर्स असोसिएशनने केली आहे.जिम ऑनर्स असोसिएशनने सदस्यांनी आज मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली.

कल्याण - डोंबिवली मध्ये सर्वाधिक जिम मालक हे मराठी आहेत. कोरोनाच्या संकटकाळात शासनाच्या नियमांचे पालन करत त्यांनी जवळपास आता 5 महिने जिम बंद ठेवल्या होत्या. मात्र आता कल्याण डोंबिवली मधील व्यापाऱ्यांची दुकान तसेच मार्केट सूरु झाली आहेत.त्यामुळे आता कल्याण डोंबिवली मधील जिम देखील सुरू करा अश्या मागणीचे पत्र घेऊन पदाधिकाऱ्यांनी आमदारांची भेट घेतली आहे.

कोरोनाच्या संकटकाळात सर्वच व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामध्ये जिम मालकांचा देखील समावेश आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलेल्या दुकान सुरू करण्याच्या परवानगीच्या धर्तीवर जिम मालकांना देखील जिम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या कडे केली आहे.शासन आणि महापालिका आखून देणाऱ्या नियम व अटींचे पालन करून आम्ही जिम सुरू करण्यास तयार असल्याचे जिम मालकांनी सांगितले आहे. कोरोनाच्या कालखंडात जिम मालकांचे देखील मासिक भाडे, वीजबिल थकलं आहे. त्याचप्रमाणे जिम मध्ये काम कामगार वर्ग सुद्धा मोठ्याप्रमाणात आहेत.त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेने जिम मालकांना देखील काही प्रमाणात सूट द्यावी अशी मागणी जिम मालकांनी केली आहे.

कल्याण डोंबिवली मध्ये ९०% जिम चालक हे मराठी आहेत.त्यामुळे त्यांच्यावर सध्या मोठा आर्थिक संकट आले आहे.त्यामुळे शासनाने व्यापाऱ्यांचे पुनश्च : हरी ओम केलं मात्र आता जिम चालकांच कधी करणार ? असा प्रश्न सध्या चालकांसमोर आहे.येत्या काही दिवसात  जिम मालक आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता जिम चालकांच्या मागणीला केडीएमसी आयुक्त सकारात्मक प्रतिसाद देत मराठी उद्योजकांना न्यान देणार का हे पाहावे लागेल.

टॅग्स :MNSमनसेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक