भाईंदरमधून १५ लाख ६९ हजारांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST2021-03-23T04:43:03+5:302021-03-23T04:43:03+5:30

मीरा रोड : मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा - १ ने भाईंदर पश्चिम येथे दोन ठिकाणी छापे ...

Gutkha worth Rs 15 lakh 69 thousand seized from Bhainder | भाईंदरमधून १५ लाख ६९ हजारांचा गुटखा जप्त

भाईंदरमधून १५ लाख ६९ हजारांचा गुटखा जप्त

मीरा रोड : मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा - १ ने भाईंदर पश्चिम येथे दोन ठिकाणी छापे टाकून १५ लाख ६९ हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या काशीमीरा युनिट १ मधील पोलीस नाईक पुष्पेंद्र थापा भाईंदर पश्चिमेस जय जलाराम जनरल स्टोअर आणि गणेश देवलनगरच्या पालिका शौचालयाजवळील खोलीत प्रतिबंधीत गुटख्याच्या साठा असल्याची माहिती रविवारी मिळाली. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास कुटे, उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांच्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापे टाकून गुटख्याचा साठा जप्त केला. जलाराम स्टोरमधून ९ लाख ८८ हजारांचा, तर गणेश देवलनगरमधून ५ लाख ८१ हजारांचा गुटखा सापडला. येथून शहरातील पानटपऱ्या, दुकानात गुटखा पुरविला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

.........

Web Title: Gutkha worth Rs 15 lakh 69 thousand seized from Bhainder