८९ लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 23:33 IST2017-08-12T23:33:29+5:302017-08-12T23:33:29+5:30
भिवंडीतील एका गोडाउनवर ठाणे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नारपोली पोलिसांनी संयुक्तरीत्या छापा टाकून, दोन ट्रकमधील ८८ लाख ५४ हजारांचा गुटखा जप्त केला आहे, तसेच ते गोडाउनही सील केल्याची माहिती एफडीएने दिली.

८९ लाखांचा गुटखा जप्त
ठाणे : भिवंडीतील एका गोडाउनवर ठाणे अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नारपोली पोलिसांनी संयुक्तरीत्या छापा टाकून, दोन ट्रकमधील ८८ लाख ५४ हजारांचा गुटखा जप्त केला आहे, तसेच ते गोडाउनही सील केल्याची माहिती एफडीएने दिली.
गुटखा, पानमसाला आणि सुगंधी सुपारी विक्रीस राज्यात बंदी आहे. याबाबत २० जुलै २०१७ रोजी परिपत्रक शासनाने काढले आहे. तरीही मुंबईत विक्रीसाठी गुजरात येथून चोरट्या मार्गाने गुटखा आणून, तो भिवंडीतील संभव कॉम्प्लेक्स येथील गोडाउन साठवून ठेवल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार, ठाणे एफडीएचे सहायुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकला.