शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुपौर्णिमा हा तर निष्ठा, विश्वासाचा उत्सव; खा. राजन विचारे यांचा एकनाथ शिंदेंना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 06:42 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे माझे गुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे  : गुरुपौर्णिमा म्हणजे निष्ठा आणि विश्वास यांचा उत्सव असतो, असे सांगत शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला. शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे माझे गुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तेथे पत्रकारांशी बोलताना विचारे म्हणाले की, ठाकरे यांचा आशीर्वाद आणि दिघे यांची शिकवण यांमुळेच आज माझ्यासारखा सर्वसामान्य शिवसैनिक खासदार होऊ शकला. मागील ४० वर्षे मी एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून मराठी लोकांसाठी व हिंदुत्वासाठी काम करीत आहे. तळागाळातील लोकांना न्याय देण्याचे काम सर्वसामान्य शिवसैनिक करीत आहेत.  

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ध्येयानेच शिवसेनेची वाटचाल सुरू आहे. दिघे हे शेवटच्या श्वासापर्यंत ‘शिवसेना एके शिवसेना’ या ध्यासाने तळागाळातील लोकांसाठी तसेच ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी काम करीत होते.  

दोन शिष्य वेगळे झाले आनंद दिघे यांचे शिष्य शिंदे आणि विचारे हे नेहमी गुरुपौर्णिमा एकत्रित आनंद मठात साजरी करीत होते; पण यंदा राजकीय समीकरण बदलल्याने बुधवारी विचारे हे एकटेच आनंद मठात येऊन ठाकरे आणि दिघे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून गेले. त्यानंतर ते शक्तिस्थळावर गेले होते.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे