विमान आणि विमानशास्त्राच्या ऑनलाईन उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 

By प्रज्ञा म्हात्रे | Published: September 3, 2023 02:24 PM2023-09-03T14:24:55+5:302023-09-03T14:25:54+5:30

“पहली उडान” उपक्रमाचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड संपन्न 

guinness world records for aviation and aeronautics online activities | विमान आणि विमानशास्त्राच्या ऑनलाईन उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 

विमान आणि विमानशास्त्राच्या ऑनलाईन उपक्रमाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, ठाणे: भारत देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. नुकताच चांद्रयान-३ च्या यशस्वी उड्डाणानंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदी वातावरणात विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था व व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने पहली उडान हा ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाt एकच वेळी ऑनलाईन  विमानशास्त्र शिकण्यासाठी 3091 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. मागचा  रेकॉर्ड १५०० विद्यार्थ्यांचा होता. 

विविध माध्यमे आणि प्रत्यक्ष शाळा - महाविद्यालय यांच्या माध्यमातून अंदाजे ३ करोड ६० लाख लोकांपर्यंत  हा उपक्रम पोहोचला. विमानशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांसह सर्वांनाच सोप्या भाषेत समजण्यासाठी व त्याविषयी जनजागृती करण्यासाठी या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. या शैक्षणिक उपक्रमास,   भारतातील अनेक राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक  पालक आणि शाळा महाविद्यालयांनी  उस्फुर्त प्रतिसाद दिला. एकाच वेळी ऑनलाईन  विमानशास्त्र शिकण्यासाठी 3091 विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी रविवारी सकाळी 10.00 ते 10.30 या वेळेत  ऑन लाईन you tube वर उपस्थिती  दर्शवली . सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.

या गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम रविवारी फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया-टीएमए हॉल येथे  संपन्न झाला. या कार्यक्रमाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चे  चीफ एजुडीकेटर ऋषी  नाथ, फॅसिलेटेटर  मिलिंद वेर्लेकर  उपस्थित होते. ऋषी  नाथ ह्यांच्या  हस्ते टींकर टाईमचे संस्थापक  पुरुषोत्तम पाचपांडे यांना  गिनीज वर्ल्ड रेकॉडचे  प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपस्थित सर्वांनी टींकर टाईम संस्था आणि व्यास क्रिएशन्स संस्थेचे अभिनंदन केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब 3142, राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था ठाणे या सहयोगी संस्था आणि कप्तान निशांत पाटील,कॅप्टन शर्विन जोशी,कॅप्टन ऋषीकेश  नवले, कॅप्टन अग्नेल,माधव खरे, प्रशांत नानिवडेकर, सुशांत गायकवाड, मंदार कुलकर्णी आदी व्यक्तींचे  आणि व्यास क्रिएशन्स टीमचे सहकार्य लाभले  त्यांचे कौतुक आणि आभार व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्रेया कुलकर्णी  यांनी केले.

 

Web Title: guinness world records for aviation and aeronautics online activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.