डहाणूतील चिकू उत्पादकांना जीआयचे शनिवारी मार्गदर्शन
By Admin | Updated: November 18, 2016 02:03 IST2016-11-18T02:03:55+5:302016-11-18T02:03:55+5:30
जागतिक बाजारपेठेत डहाणू घोलवडच्या चिकूला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले असून त्याच्या नोंदणीबद्दल विशेष मार्गदर्शनाचे आयोजन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.

डहाणूतील चिकू उत्पादकांना जीआयचे शनिवारी मार्गदर्शन
बोर्डी : जागतिक बाजारपेठेत डहाणू घोलवडच्या चिकूला भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त झाले असून त्याच्या नोंदणीबद्दल विशेष मार्गदर्शनाचे आयोजन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.
डहाणूतील चिकू बागायतदारांसाठी ही अभिमानास्पद बाब असून आर्थिक विकास साधण्याची महत्वपूर्ण संधी आहे. दरम्यान
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील चिकू हे प्रमुख पीक असून साडेचारहजार हेक्टर क्षेत्र चिकू बागायतीने व्यापले आहे. या वर्षी देशभरातून ज्या पाच फळांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले त्या मध्ये चिकूचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाने या करिता अर्ज केला होता. त्यानुसार २९ जून रोजी डहाणू चिकू या नावाने जागतिक बाजारपेठेत चिकूला ऐतिहासिक ओळख मिळाली आहे.
तालुक्यातील चिकू बागायतदारांसाठी ही अभिमानास्पद बाब असून त्यामुळे घसघाशीत आर्थिक लाभ होणार आहे.
दरम्यान, पुणे येथील ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टंसी या संस्थेचे मुख्याधिकारी प्राध्यापक गणेश हिंगमिरे हे शनिवारी डहाणूतील चिकू भागायतदारांना भौगोलिक मानांकन म्हणजे काय? त्याचा बागायतदारांना कोणता लाभ घेता येईल या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. या करिता डहाणूतील कृषक समाज कार्यालयात सकाळी ९ वाजता, बोर्डीतील गजीताई सभागृहात साडेनऊ वाजता तर दुपारी तीन वाजता चिंचणी सोसायटी कार्यालयात हे मार्गदर्शन शिबीर घेण्यात येणार आहे. या करिता बागायतदारांनी उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक पालघर जिल्हा कृषी अधिक्षक आर. जी. पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी एस. डी. सावंत यांनी केले आहे.त्याचा लाभ जास्तीत जास्त चिकू बागायतदार घेण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)