आशांसह गटप्रवर्तकांचा सोमवारपासून तीन दिवस संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:26 AM2020-09-25T00:26:20+5:302020-09-25T00:26:41+5:30

ना मास्क, ना छापील फॉर्म : कसे करणार कोरोना सर्वेक्षणाचे काम

Group promoters strike for three days from Monday | आशांसह गटप्रवर्तकांचा सोमवारपासून तीन दिवस संप

आशांसह गटप्रवर्तकांचा सोमवारपासून तीन दिवस संप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी आरोग्य पथके तयार केली आहेत. परंतु, बहुतांश ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असलेला दोनपैकी एकही स्वयंसेवक मिळालेला नाही. उलटपक्षी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनाच त्यांच्या घरातील व्यक्तींना आणण्याची सक्ती केली जात आहे. या सक्तीच्या विरोधासह प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील आशा व गटप्रवर्तक २८ सप्टेंबरपासून संपात उतरत आहे, असे महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे नेते अ‍ॅड. एम.ए. पाटील यांनी सांगितले.


आहे त्या स्वयंसेविकांकडे अ‍ॅन्ड्रॉइड फोन नसल्यामुळे केलेल्या कामाचे रेकॉर्ड त्या ठेवू शकत नाहीत. ज्या ठिकाणी मोबाइल रेंज जात नाही, त्या ठिकाणी मोहिमेसाठी छापील फॉर्म पुरविण्याची सूचना केली आहे.
परंतु, असे कोणतेही फॉर्म पुरवलेले नाहीत. कोठेही टी-शर्ट, कॅप, बॅज, हॅण्ड ग्लोव्हज मास्क, सॅनिटायझर देण्यात आलेले नाहीत, स्टिकर्स व मार्कर पेन कोठेही देण्यात आलेले नाहीत.
मोहीम कार्यान्वित करून सहा दिवस झाले, तरी या योजनेची अंमलबजावणी कार्यान्वित झालेली नाही. आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी दोन स्वयंसेवक न पुरविल्यामुळे त्या एकट्या या मोहिमेचे काम करू शकत नाहीत. या गंभीर बाबींकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने राज्यस्तरीय तीनदिवसीय संपाचा इशारा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

या आहेत आमच्या विविध मागण्या
या मोहिमेसाठी गटप्रवर्तकांना प्रतिदिन २५ रुपयांप्रमाणे मासिक ६२५ रु. दैनिक भत्ता पूर्ववत देण्यात यावा व त्यात भरीव वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा. अधिसूचनेनुसार आशा प्रतिमहा दोन हजार रुपयांनी व गटप्रवर्तकाचे ठरावीक वेतन प्रतिमहा तीन रुपयांनी वाढवण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणी १ आॅक्टोबर २०१९ पासून करावी. मुख्यमंत्र्यांनी २०१९ मध्ये सर्व आशा स्वयंसेविकांना सायकली देण्याची घोषणा केली होती. आता तरी या घोषणेची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

Web Title: Group promoters strike for three days from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.