शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

गटशेतीचा फायदा झाला, मुख्यमंत्र्यांच्या 'विकेल ते पिकेल' कार्यक्रमात शेतकरी महिलेचा संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 18:58 IST

शहापूर तालुक्यातील चार शेतकर्‍यां पैकी  या जानकी बाईंनी मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधला आणि आपल्या गट शेतीचे महत्त्व पटवून दिले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले.

ठाणे : गट शेती करीत असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली. त्यामुळे भेंडी, मिरची गवार भाजीचे मोठ्याप्रमाणात गेल्यावर्षी उत्पन्न घेतले. याशिवाय ट्रक्टर आणि शेततळ्याचा लाभ झाल्याचे वास्तव शहापूर तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी जानकी तुकाराम बगळे यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्याशी 'विकेल ते पिकेल' या कृषी विभागाच्या आँनलाइन कार्यक्रमात संवाद साधून स्पष्ट केले.                     शहापूर तालुक्यातील चार शेतकर्‍यां पैकी  या जानकी बाईंनी मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधला आणि आपल्या गट शेतीचे महत्त्व पटवून दिले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी सांगितले. या आधी रानभाज्या विकून या शेतकर्‍यांचा उदर निर्वाह होत असे. कृषी विभागाने त्यांना 'विकेल ते पिकेल' कार्यक्रमात सहभागी करुन घेत यंदा त्यांच्या रान भाज्यांचे प्रदर्शन कल्याण व ठाणे येथे भरवून तब्बल 20 हजार रुपयांच्या रान भाज्यांची विक्री झाल्याचे बगळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले. गट शेती केल्यामुळे आर्थिक फायदा होत आहे. आता त्यांच्या गटाकडून जिल्ह्यातील शहरांना ताजा भाजीपाला व रानभाज्या पुरवण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. 

शहापूर जवळील अंदाडच्या रासदो पाडा येथील या जानकीबाई आहे.  यांच्या 100 एकरचा गट आहे. त्या एका कंपनीशी संलग्न होऊन गट शेती करतात. 70 एकरच्या गटात त्या भेंडी, काकडी, कारले, दोडके, मिरची, मेथी, वांगी आदी भाजीपाला व रान भाज्याचे उत्पन्न घेतात. वर्षाकाठी लाख रुपये लाभ होत आहे. या गट शेतीमुळे त्यांनी तीन शेततळी मंजूर झाले आहेत. त्यांना दोन ट्रक्टर विकत घेता आले. रान भाज्या वाळून, सुकवून त्या 20 वर्षांपासून विकत आहे. रान भाज्यांचे आयुर्वेदिक महत्व शहरी भागात पटवून दिल्यामुळे त्याचे ग्राहक वाढले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री