शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जन्म, स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षलागवड करून हरित महाराष्ट्रचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:45 IST

‘वृक्षांची जोपासना हीच खरी निसर्गाची उपासना’ या सूत्राद्वारे महाराष्ट्राचे वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्के करून हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव वृक्षवेलींनी सजविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

- नारायण जाधवठाणे : ‘वृक्षांची जोपासना हीच खरी निसर्गाची उपासना’ या सूत्राद्वारे महाराष्ट्राचे वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्के करून हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव वृक्षवेलींनी सजविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घरांत मुल जन्माला येणे असो वा मंगलकार्यांचा आनंद साजरा करणे ते कुणाचे निधन झाल्यावर त्या मृतांच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या मदतीने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे.पर्यावरण समतोल राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रानमळा या गावाने लोकसहभागातून गावात कुणाचा जन्म, विवाह वा देवाज्ञा झाल्यास आठवण म्हणून वृक्षलागवड करून गाव हिरवेगार केले. हे उदाहरण लक्षात घेता ग्रामविकास विभागाने हा हरित महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेतला आहे.अशी करणार रोपांची उपलब्धतासंबधित ग्रामपंचायतील दानशूर व्यक्ती, सीआरर फंड किंवा सामाजिक वनीकरण विभागाच्या वनमहोत्सवातून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून द्यावीत. यासाठीचा निधी आपल्या उत्पन्न स्त्रोतांतून भागवावा.वृक्षलागवडीसाठी १ जुलै ते ३० जून हा कालावधी गृहीत धरला असून या कालावधीत गावात किती रोपे लागतील, याचा अंदाज ग्रामपंचायतीने घ्यायचा आहे. मात्र, रोपांचे वाटप १ जुलै या दिवशी एकदाच करावे. नंतर संबधित व्यक्तीने त्या रोपाचे वाटप १ ते ७ जुलै रोजी या काळात करून तशी नोंद ग्रामपंचायतींच्या रजिस्टरमध्ये करून त्याचे संवर्धन करायचे आहे.असा आहे पंचसूत्री कार्यक्रम१ शुभेच्छा वृक्ष : वर्षभरात गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचे स्वागत संबधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करावे. अशी कुटुंबे त्या झाडाचे लागवड करून संवर्धन करतील.२ शुभमंगल वृक्ष : गावात ज्यांचे विवाह होतील, त्यांना फळझाडांची रोपे देऊन शुभआशिर्वाद द्यावेत.३ आनंदवृक्ष : वर्षभरात जी मुले दहावी,बारावी उत्तीर्ण होतील, गावातील ज्या तरूण-तरुणींना नोकरी लागेल वा जे निवडून येतील त्यांना अशा आनंदाच्या क्षणी फळझाडांची रोपे देऊन त्यांचे स्वागत करावे.४ माहेरची झाडी : गावातील ज्या कन्यांचे विवाह होतील, त्यांना सासरी जाऊन झाडांची रोपे देणे अवघड असते. या विवाहित कन्येच्या माहेरच्या लोकांना झाडांचे रोप देऊन स्वागत करावे. संबधित कुटुंब रोपांचे लेकीप्रमाणे जोपासना करतील, अशी अपेक्षा आहे.५ स्मृती वृक्ष : एखाद्या गावात ज्या व्यक्तीचे निधन होते, त्या कुटुंबाला झाडांचे रोप देऊन श्रद्धांजली अर्पण करावी. अशा रोपाची लागगड करून आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती संबधित कुटुंब जपतील, असा विश्वास ग्राम विकास विभागाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र