बालकाच्या हत्येत आजोबांचा हात
By Admin | Updated: April 1, 2016 02:56 IST2016-04-01T02:56:11+5:302016-04-01T02:56:11+5:30
काजूपाडा येथील हिमेश उर्फ मोनू विकास चौधरी या साडेतीन वर्षाच्या बालकाची हत्या त्याचे चुलत आजोबा वासुदेव चौधरी (५७) यांच्या सांगण्यावरून केल्याचे उघड झाले आहे.

बालकाच्या हत्येत आजोबांचा हात
मीरा रोड : काजूपाडा येथील हिमेश उर्फ मोनू विकास चौधरी या साडेतीन वर्षाच्या बालकाची हत्या त्याचे चुलत आजोबा वासुदेव चौधरी (५७) यांच्या सांगण्यावरून केल्याचे उघड झाले आहे. अटकेतील आरोपी बाबासाहेब गौतम वाकळे (२२) याने त्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी चौधरीला अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत कोठडी दिली आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही.
होळीच्या आदल्या रात्री घराजवळून हिमेश अचानक बेपत्ता झाला व त्याचा मृतदेह आश्रमामागील जंगलात बॅगेत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी भाडेकरू बाबासाहेब गौतम वाकळे याला अटक केली. त्याने हिमेशचे चुलत आजोबा वासुदेवच्या सांगण्यावरून हत्या केल्याचे कबूल केल्याने त्यालाही अटक केली. वाकळेने हिमेशला खाऊच्या बहाण्याने घरी बोलावले. तो येताच पाण्याच्या टबमध्ये तोंड बुडवून त्याची हत्या केली. नंतर बॅगेत त्याचा मतृदेह भरला आणि तो जंगलात नेउन टाकल्याचे त्याने कबूल केले.