ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका
By अजित मांडके | Updated: October 7, 2022 19:28 IST2022-10-07T19:28:16+5:302022-10-07T19:28:57+5:30
ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

ठाण्यात दरवाजा बंद झाल्याने अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका
ठाणे : ढोकाळी येथे शेल इमारतीच्या १२-व्या मजल्यावरील रूम अडकलेल्या ८२ वर्षीय सुभाष गुप्ते नामक आजोबांची सुखरूप सुटका करण्यात ठामपाच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागांना यश आले आहे. सुखरूप सुटका केल्यानंतर त्या आजोबांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. हा प्रकार शुक्रवारी दुपारी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडला होता.
ढोकाळी येथील तळ अधिक १७ मजली शेल इमारतीच्या १२-व्या मजल्यावरील रूम गुप्ते नामक ८२ वर्षीय आजोबा अडकल्याची माहिती मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच या विभागांनी दरवाज्याचे लॉक तोडून रूममध्ये अडकलेल्या आजोबांची सुखरूप सुटका केली आणि, त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. अडकलेले आजोबा हेच त्या घराचे मालक असून घराचा मुख्य दरवाजा लॉक झाल्याने ते अडकले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.