तलासरीत ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरु

By Admin | Updated: November 18, 2016 02:02 IST2016-11-18T02:02:35+5:302016-11-18T02:02:35+5:30

राज्यातील ग्रामसेवकांच्या पंधरा प्रलंबित मागण्यांसाठी या तालुक्यातील ग्रामसेवकांनी आज पासून काम बंद आंदोलन सुरु करून

Gramsevak's 'Kambandand' started in the village | तलासरीत ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरु

तलासरीत ग्रामसेवकांचे ‘कामबंद’ सुरु

तलासरी : राज्यातील ग्रामसेवकांच्या पंधरा प्रलंबित मागण्यांसाठी या तालुक्यातील ग्रामसेवकांनी आज पासून काम बंद आंदोलन सुरु करून ग्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के तलासरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल धूम यांच्या कडे सुपूर्त केल्या.
सात नोव्हेंबरला ग्रामसेवकांनी पंचायत समितीवर धरणे धरले. त्या नंतर ११ नोव्हेंबरला जिल्हा परिषदे समोर धरणे धरण्यात आले तसेच पंधरा नोव्हेंबर ला आयुक्त कार्यालयावर एक दिवशीय धरणे धरण्यात आली तरी सुद्धा ग्रामसेवकांच्या मागण्या मान्य न झाल्याने तलासरी तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी गुरूवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले. तलासरी तालुक्यातील एकवीस ग्रामपंचायतीच्या चाव्या व शिक्के तलासरीचे गट विकास अधिकारी राहुल धूम यांच्या कडे ग्राम
सेवक संघटनेचे अध्यक्ष मोहन पाचलकर सुपूर्त केल्या या वेळी विस्तार अधिकारी नाळे, ग्राम विकास अधिकारी पंढरी पाटील, गणपत गवळी, इत्यादिसह तालुक्यातील
सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांची मोठी अडचण होणार आहे.
(वार्ताहर)

Web Title: Gramsevak's 'Kambandand' started in the village