ग्रा.पं. निवडणुकीची रणधुमाळी
By Admin | Updated: April 8, 2016 01:35 IST2016-04-08T01:35:08+5:302016-04-08T01:35:08+5:30
जिल्ह्यातील मे ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या १२२ ग्रामपंचायतींसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या उमेदवारांना

ग्रा.पं. निवडणुकीची रणधुमाळी
ठाणे : जिल्ह्यातील मे ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या १२२ ग्रामपंचायतींसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आहे. गुरुवारपासून या उमेदवारांनी प्रचारास प्रारंभ केला आहे.
या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आता आचारसंहिता पूर्णपणे लागू झाली आहे. जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात सर्वाधिक ६७ ग्रा.पं., मुरबाडमधील २९, भिवंडीमधील २७ आणि अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रा.पं.ची निवडणूक हाती घेतली आहे.