राजस्व अभियानांतर्गत होणार शासकीय जत्रा

By Admin | Updated: November 17, 2016 07:23 IST2016-11-17T07:23:56+5:302016-11-17T07:23:56+5:30

राजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत येत्या २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान शासकीय जत्रेचे आयोजन केल्याचे तहसीलदार सर्जेराव मस्के-पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

The government will go under the revenue campaign | राजस्व अभियानांतर्गत होणार शासकीय जत्रा

राजस्व अभियानांतर्गत होणार शासकीय जत्रा

मुरबाड : मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून नागरिकांची शासनदरबारी गेले अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तत्काळ निकाली काढून त्यांना अत्यावश्यक लागणारे दाखले तसेच शासकीय योजनांचे लाभ त्वरित मिळवून देण्यासाठी राजस्व अभियान कार्यक्रमांतर्गत येत्या २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान शासकीय जत्रेचे आयोजन केल्याचे तहसीलदार सर्जेराव मस्के-पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
मुरबाड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर तसेच कल्याण-शहापूर या तालुक्यांतील गावांचाही समावेश होत असल्याने त्या ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या नागरिकांना आपल्या विविध कामांसाठी अंबरनाथ, बदलापूर, कल्याण व शहापूर या ठिकाणी असलेल्या तहसीलदार, पंचायत समिती, नगरपंचायत, नगरपालिका, राज्य परिवहन विभाग, एमआयडीसी, एसटी महामंडळ, वन विभाग, तालुका कृषी, आरोग्य विभाग अशा महत्त्वाच्या ठिकाणी वेळोवेळी हेलपाटे मारावे लागतात.
परिणामी, अधिकारीवर्ग हा वेळेवर कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांचा वेळ वाया जाऊन त्यांना आर्थिक भारही सोसावा लागतो. या समस्येतून नागरिकांची सुटका करण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड विधानसभा मतदारसंघात या शासकीय जत्रेचे आयोजन केले असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे दाखले, संजय गांधी निराधार योजनेचा व श्रावण बाळ योजनेचा लाभ, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रि मिलेअर, वास्तव्य, जन्ममृत्यूचे दाखले, आरटीओचे लायसन्स, शिवाय तालुका कृषी विभागामार्फत विविध योजनांचा लाभ, नगरपंचायत व नगरपालिका यांच्या विविध योजनांचे लाभ, पंचायत समितीस्तरावरून असलेल्या विविध योजनांचे लाभ व अत्यावश्यक अशा सुमारे २ लाख ५० हजार नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप आणि योजनांचा लाभ देण्याचा संकल्प कथोरे यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: The government will go under the revenue campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.