शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पुसली पाने, नुकसानभरपाई मिळाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 01:12 IST

शहापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊसच लवकर गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही.

भातसानगर - शहापूर तालुक्यात मागीलवर्षी पाऊसच लवकर गेल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. शेतक-यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर्षीची तुटपुंजी मदत कृषी विभागाकडे जमा झाली आहे.काही महिन्यांपूर्वी शेतकºयांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा झाली. ही रक्कम मागीलवर्षीची होती असा शेतक-यांचा समज झाला. मात्र चौकशीअंती ही २०१७ च्या आॅक्टोबर ची पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत असल्याचे स्पष्ट झाले.मागीलवर्षी आॅगस्टमध्येच पाऊस गेल्याने माळरानातील भातशेती पार होरळून गेली होती. या नुकसानीचे पंचनामे होण्याच्या मागणीसाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केल्या नंतर कृषी विभाग यांच्यामार्फत नुकसानीचे पंचनामेही केले होते. ५० टक्के नुकसान झाल्याचेही तहसीलदार यांनी जाहीरही केले. मात्र सरकारदरबारी याची कोणत्याच प्रकारची दखल घेतली न गेल्याने तालुक्यातील शेतकºयांना एक दमडीही मंजूर करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले.मागीलवर्षी २१९ गावांमध्ये १५ हजार ७२३ हेक्टर पिकाखाली होते. २७ हजार ४४२ शेतकºयांना याचा फटका बसला होता. ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान शेतकºयांचे झाले होते.मात्र पंचनामे होऊनही शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली. २०१७ च्या आॅक्टोबरमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईची रक्कम २ कोटी ३८ लाखांचे काही महिन्यांपूर्वी वाटप करण्यात आले. यामध्ये २६ हजार ७१८ शेतकºयांना ती वाटप करण्यात आली. मात्र मागीलवर्षीची नुकसानभरपाई मंजूर झाली नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.यावर्षी ३३ टक्के नुकसानीचा अहवाल देण्यात आला असून पिकाखाली क्षेत्र १७ हजार २९.१२ तर नुकसानग्रस्त क्षेत्र ११ हजार ७७६.६७ हेक्टर इतके असून २४ हजार १९० शेतकºयांना त्याचा फटका बसला आहे. यासाठी हेक्टरी ८ हजार इतकी तुटपुंजी मदत सरकारने जाहीर केल्याने शेतकरी निराश झाला आहे.मागीलवर्षी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकºयांना सरकारकडून देण्यात आली नाही.- जे. एस.जायभाय, प्रभारी तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरीthaneठाणे