शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सुगंधी वृक्षलागवडीवरून प्रशासन येणार अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 23:04 IST

मिलिंद पाटणकर यांनी मागितली माहिती; ठामपा प्रशासनापुढे पेच

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुगंधी वृक्षलागवड करण्यात येणार असून यासाठी सुमारे १० कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. परंतु, याच विषयाच्या अनुषंगाने मागील पाच वर्षांत पालिकेने किती वृक्ष लावले, किती जगवले, कितींना तोडण्याची परवानगी दिली, यासह इतर प्रश्नांची उत्तरे आता वृक्ष प्राधिकरण विभागाला द्यावी लागणार आहे. भाजपाचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी याबाबत प्रशासनाला पत्र लिहून माहिती मागितली आहे. त्यामुळे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला असून हा मुद्दा महासभेत चांगलाच गाजणार आहे.आता याच विषयाच्या अनुषंगाने पाटणकर यांनी काही प्रश्न प्रशासनाला केले असून त्याची उत्तरे आता त्यांना महासभेत द्यावी लागणार आहेत. पाच वर्षांत जी पाच लाख झाडे लावलीा, त्याचा तपशील म्हणजे ठिकाण, लावलेली झाडे व त्यासाठीचा खर्च, झाडे तोडण्यासाठीची परवानगी देताना वृक्ष तोडणाऱ्यास पाच आणि आता १५ झाडे लावण्याची अट असते, याअंतर्गत किती व कोठे झाडे लावली आहेत, त्यांच्या निगा, देखभालीसाठी वृक्ष प्राधिकरण झाडामागे निधी / दंड घेते. असा किती निधी आतापर्यंत जमा झाला व त्याचा उपयोग कोठे, कसा करण्यात आला, असे प्रश्न पाटणकर यांनी उपस्थित करून त्याची माहिती देण्याची मागणी केली आहे.सुगंधी वृक्षलागवड, देखभालीसाठी १० कोटीमहापालिका दरवर्षी एक लाख वृक्षांची लागवड करते. परंतु, त्यापैकी किती जगले आणि किती मृत पावले किंवा किती वृक्षतोडीला परवानगी दिली, याची पूर्ण माहिती पालिकेकडे सध्या तरी उपलब्ध नाही.त्यातही निगा-देखभालीच्या नावाखाली पालिका कोट्यवधींचा खर्चही करत आहे. त्यात आता नव्याने एक लाख सुगंधी वृक्षांची लागवड करणार असून निगा आणि देखभालीसाठी १० कोटींचा खर्च करणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका