शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

गोरेगावात 800 अल्पसंख्याकांनी केला शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 19:06 IST

सुभाष देसाई यांनी अल्पसंख्याक समाज बांधवांना दिलासा देत सांगितले की, शिवसेना पक्ष कधी जात-पात मानत नसून प्रामाणिक निष्ठेने सामाजिक कार्य करणार्या तळागाळातील कार्यकर्त्याला कुठलाही भेदभाव न करता संधी देते

ठळक मुद्देसुभाष देसाई यांनी अल्पसंख्याक समाज बांधवांना दिलासा देत सांगितले की, शिवसेना पक्ष कधी जात-पात मानत नसून प्रामाणिक निष्ठेने सामाजिक कार्य करणार्या तळागाळातील कार्यकर्त्याला कुठलाही भेदभाव न करता संधी देते

मनोहर कुंभेजकर

मुंबई : आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीला अजून सुमारे एक वर्ष बाकी असतांना विविध जाती धर्माचे नागरिक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चित्र आहे. अलिकडेच चारकोप येथील अनेक अल्पसंख्याक बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला असतांना, शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे 800 अल्पसंख्याक बांधवांनी शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. गोरेगांव पश्चिम, संस्कार धाम विद्यालयाच्या पटांगणात "समस्यांवर समाधान" या शिर्षका अंतर्गत शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत अल्पसंख्याक समाजाचे समाजसेवक हनीफ मलबारि उर्फ अन्नु मलबारी यांनी हजारों मुस्लिम बांधवांसहित शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.

याप्रसंगी सुभाष देसाई यांनी अल्पसंख्याक समाज बांधवांना दिलासा देत सांगितले की, शिवसेना पक्ष कधी जात-पात मानत नसून प्रामाणिक निष्ठेने सामाजिक कार्य करणार्या तळागाळातील कार्यकर्त्याला कुठलाही भेदभाव न करता संधी देते.अल्पसंख्याक  समाजाच्या काही समस्या शिवसेनाप्रमुखांनी चुटकीसरशी कशा सोडविल्या या आठवणींना उजाळा देत प्रकाश टाकला व त्यांनी समाजाची मने जिंकून घेतली.

इस्तेमाह करिता मैदान उपलब्ध होत नसल्याची समस्या घेऊन आलेल्या काही अल्पसंख्याक नेत्यांना शिवसेनाप्रमुखांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना आदेश देत बीकेसी येथिल मैदान केवळ एका फोनवर क्षणात कसे उपलब्ध करुन दिले. त्याचप्रमाणे हज यात्रेकरिता परराज्यातून येणाऱ्या समाज बांधवांकरिता बांधलेले हज हाऊस दिर्घ कालावधीपासून बंद अवस्थेत पडले आहे ही समस्या लक्षात येताच तातडिने हज हाऊस सुविधांसहित सुरु करण्याचे‌ आदेश शासनाला युती शासनाला शिवसेनाप्रमुख देताच हज हाऊस पुन्हा सुरु झाले असे‌ अनेक दाखले  मंत्री महोदयांनी पक्ष प्रवेशकर्त्या अल्पसंख्याक बांधवांना देत त्यांना आत्मविश्वास दिला व आश्वासित केले. अल्पसंख्याक बांधवांना पक्षात मानसन्मान ,सच्चे प्रेम, व भाईचारा मिळेल. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी एसआरएच्या समस्यांवरही सविस्तर संबोधन करत या  प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी शासनदरबारी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करण्याचे मंत्रीमहोदयांनी आश्वासन दिले.

या प्रसंगी समाजसेवक हनीफ मलबारी उर्फ अन्नु मलबारी यांनी आपल्या भाषणात उद्योगमंत्र्यांचे आभार मानत शिवसेना पक्ष प्रवेशाकरिता सलग तीन महिने संपर्कात असणारे  विधानसभा संघटक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांचा उल्लेख केला.  येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत अल्पसंख्याक समाज पूर्ण ताकदिनिशी शिवसेना पक्षासोबत ठामपणे उभा राहिल व कसोशिने झटून गोरेगांव विधानसभेत शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडुन देण्या करिता कटिबध्द राहू असे आश्वासन दिले. यावेळी विधानसभा संघटक व  माजी नगरसेवक  दिलिप शिंदे, विधानसभा संघटक व माजी नगरसेवक राजू पाध्ये, विधानसभा समन्वयक दिपक सुर्वे, विधानसभा उपसमन्वयक अजय नाईक, मा़जी नगरसेवक समीर देसाई, महिला विधानसभा संघटक,माजी नगरसेविका लोचना चव्हाण, शशांक कामत, अशरफ अली खान, लक्ष्मी भाटीया, शबाना ठाकूर व इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :MumbaiमुंबईShiv Senaशिवसेना