शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील वकिलाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास गुंडाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 00:04 IST

कळवा येथील वकिल विक्रांत निंबाळकर यांच्या कार्यालयात कोयता घेऊन दोन साथीदारांसह शिरकाव करुन त्यांना धमकी देणाºया संजय गाडेकर (३१) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे तीन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्दे ठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईठाण्यासह नवी मुंबईतही गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कळवा येथील वकिल विक्रांत निंबाळकर यांच्या कार्यालयात कोयता घेऊन दोन साथीदारांसह शिरकाव करुन त्यांना धमकी देणाºया संजय गाडेकर (३१) या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे. त्याच्या अन्यही दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.अ‍ॅड. निंबाळकर हे २९ मे २०२१ रोजी त्यांच्या विटावा येथील कार्यालयात बसले होते. त्याचवेळी गाडेकर हा त्याच्या दोन साथीदारांसह कोयता घेऊन त्यांच्या कार्यालयात शिरला. त्याने अ‍ॅड. निंबाळकर यांना कोयत्याचा धाक दाखवून ‘पांग्या भगत याची गाडी जाळल्याचे फूटेज तूच पोलिसांना दिले ना?’ अशी विचारणा करीत त्यांना ‘तू पांग्या भगतची केस लढायची नाहीस, नाहीतर तुला मारुन टाकेन,’ अशी धमकी दिली. त्यावेळी त्याने त्याच परिसरात राहणारे परेश भोईर यांनाही कोयता दाखवून ‘पांग्या कोठे आहे, सांग नाहीतर तुला बघून घेईल,’ असे धमकावत त्यांना मारहाण केली. नंतर कोयता हवेत फिरवून विटावा परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही ठाणे शहरात व्हायरल झाले होते. याप्रकरणी अ‍ॅड. निंबाळकर यांनी कळवा पोलीस ठाण्यात शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती.* गाडेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. त्याच्याकडून अ‍ॅड. निंबाळकर यांच्या जीवाला धोका पोहण्याची शक्यता निर्माण झाल्याने या गुन्हयाची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून कळवा गोपाळरावनगर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ३ जून रोजी सायंकाळी ताब्यात घेतले.* गाडेकर याने या सर्व प्रकाराची कबूली दिली आहे. त्याने पांग्या भगत याची स्कॉर्पिओ गाडी जाळल्याचे तसेच रबाले एमआयडीसी परिसरात संतोष अंगरख याला २९ मे रोजी जबर मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचीही कबूली दिली. या दोन्ही प्रकरणांची अनुक्रमे कळवा आणि नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेमुळे तीन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र