सात दिवसांच्या १५ हजारांहून अधिक बाप्पांना निरोप
By Admin | Updated: September 24, 2015 00:07 IST2015-09-24T00:07:02+5:302015-09-24T00:07:02+5:30
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गुलाल उधळत व ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढून

सात दिवसांच्या १५ हजारांहून अधिक बाप्पांना निरोप
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत गुलाल उधळत व ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढून सात दिवसांच्या सुमारे १५ हजारांहून अधिक गणरायाला भक्तांनी साश्रु नयनाने बुधवारी निरोप दिला. यावेळी काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीच्या मार्गात बदल केला होता.
शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत सार्वजनिक ९९ तर घरगुती १५,३२७ गणपतींना निरोप देण्यात आले. ठाणे शहरात ९ सार्वजनिक तर घरगुती १२३१, भिवंडीत ४१ घरगुती, कल्याण-डोंबिवलीत ४८ सार्वजनिक तर ५७०० घरगुती, उल्हासनगर, बदलापूर-अंबरनाथ येथे २० सार्वजनिक तर ७२२५ घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
पालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर, कोपरी याठिकाणी विसर्जन महाघाट तयार केले आहेत. तसेच रायलादेवी ,बाळकुम रेवाळे तलाव, उपवन निळकंठ वुड्स- टिकुजीनीवाडी, खारेगाव, मासुंदा तलाव, यांसारख्या ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली असून त्यात बाप्पांना भाविकांनी निरोप दिला.