शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गुडन्यूज... शहरी भागात वसलेले देशातील पहिले अन् महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 15:39 IST

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे खाडीला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे

ठाणे - भारतातील शहरी भागातील पहिले रामसर स्थळ म्हणून ठाणे खाडीला दर्जा देण्यात आला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेशातील पहिले आणि महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ घोषित करण्यात आले. त्यानुसार, ठाणे खाडीच्या जागेची ''रामसर कन्व्हेन्शनकडून आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ'' म्हणून घोषणा करण्यात आली. त्यामुळे, हे शहरी भागात वसलेले देशातील पहिले रामसर पाणथळ ठरले आहे. 

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे खाडीला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे. या घोषणेमुळे ठाणे खाडीला आंतरराष्ट्रीय महत्व प्राप्त झाले आहे. देशभरात महानगरातील विशेषत: मुंबई महानगर प्रदेशातील अशा प्रकारचा दर्जा मिळालेली ही पहिलीच पाणथळ जागा आहे. एकूण व्याप्त ६५२२.५ हेक्टरपैकी १६९०.५ हेक्टर हे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य (TCFS) असून, ४८३२ हेक्टर  अभयारण्याचा अधिसूचित पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग (Eco Sensitive Zone) आहे. महाराष्ट्रातील ही पहीलीच सर्वाधिक मोठी पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून घोषित झाली आहे. 

राज्यात सध्या नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर ८००.९६ हेक्टर आणि बुलढाणा जिल्ह्यात लोणार सरोवर ४२७ हेक्टर ही दोन्ही ठिकाणे यापूर्वी जानेवारी आणि नोव्हेंबर २०२० मध्ये रामसर स्थळ म्हणून जाहीर झाल्या आहेत. ठाणे खाडीच्या ताज्या घोषणेमुळे राज्यात तीन रामसर साईट्स झाल्या आहेत. 

रामसर कन्व्हेन्शनकडून केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरण बदल मंत्रालयास (MOEFCC) शनिवारी या घडामोडीबाबत माहीती देण्यात आली. रामसर कन्व्हेन्शनने महिनाभराच्या आतच देशातील रामसर स्थळांबाबत केलेली ही दुसरी घोषणा आहे. नुकतेच देशातील १५ पाणथळ जागा रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आल्या असून, महिनाभराच्या आत आणखी ११ रामसर स्थळ म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशातील रामसर स्थळांची एकूण संख्या ७५ झाली आहे. दक्षिण अशियातील कोणत्याही देशासाठी ही सर्वाधिक संख्या आहे. 

टॅग्स :thaneठाणेriverनदीforest departmentवनविभागMumbaiमुंबई