बिर्ला महाविद्यालयाचा सुवर्ण जयंती महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST2021-06-19T04:26:36+5:302021-06-19T04:26:36+5:30

कल्याण : देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये समाविष्ट असलेल्या कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालय ५० व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. महाविद्यालय ...

Golden Jubilee of Birla College | बिर्ला महाविद्यालयाचा सुवर्ण जयंती महोत्सव

बिर्ला महाविद्यालयाचा सुवर्ण जयंती महोत्सव

कल्याण : देशातील प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये समाविष्ट असलेल्या कल्याणच्या बी. के. बिर्ला महाविद्यालय ५० व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. महाविद्यालय व्यवस्थापन समितीने हे वर्ष सुवर्ण जयंती वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याचे उद्घाटन महाविद्यालयाच्या मुख्य संरक्षक पद्मभूषण राजश्री बिर्ला यांच्या हस्ते ऑनलाईनच्या माध्यमातून बुधवारी झाले.

यावेळी त्यांनी सर्वांचे अभिनंदन करीत महाविद्यालयाच्या भविष्यातील उज्‍ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एक योगायोग असा आहे की, महाविद्यालयाचे संस्थापक वसंतकुमार बिर्ला यांचेही जन्मशताब्दी वर्ष आहे. महाविद्यालय यंदाच्या शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणार आहे. या आयोजनात शिक्षण, संस्कृती आणि खेळ जगतातील मान्यवर व्यक्तींना निमंत्रित करण्यात येणार आहे. यंदाच्या सुवर्ण जयंती महोत्सव वर्षानिमित्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.

--------------------------

Web Title: Golden Jubilee of Birla College