उल्हासनगरात अल्पवयीन मुलांकडून ८ लाखाचे सोने केले लंपास
By सदानंद नाईक | Updated: June 5, 2023 17:16 IST2023-06-05T17:16:23+5:302023-06-05T17:16:41+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-२ सोनार गल्लीतील जियारुल जिन्नत मलिक यांचे दुकान आहे.

उल्हासनगरात अल्पवयीन मुलांकडून ८ लाखाचे सोने केले लंपास
उल्हासनगर : कॅम्प नं-३ सोनार गल्लीतील एका दुकानातून ८ लाख किमतीचे एकून १७९ ग्राम सोन्याचे दागिने आणणाऱ्या अल्पवयीन राहुल शेख या मुलाला दोन अनोळखी इसमानी बोलण्यात गुंतवून दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-२ सोनार गल्लीतील जियारुल जिन्नत मलिक यांचे दुकान आहे. मलिक यांच्या दुकानात करणारा नाईमुद्दीन यांच्या सांगण्यावरून मलिक यांच्या मित्राचा मुलगा राहुल शेख याने अमित परवानी यांच्या दुकानाचा व्यवस्थापक शंकर हजरा यांच्याकडून ८ लाख किंमतीचे एकून १७९ ग्राम सोन्याचे दागिने मलिक यांच्याकडे रविवारी सकाळी घेऊन जात होता. यावेळी दोन अनोळखी इसमानी राहुल शेख याला बोलण्यात गुंतवून सोन्याच्या दागिन्यांची पिशवी लंपास केली. दोन अनोळखी इसमानी फसवणूक केल्या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.