सोन्याची चेन लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:44 IST2021-08-14T04:44:55+5:302021-08-14T04:44:55+5:30

------------------------------------------- ४० हजारांचा मुद्देमाल चोरीला कल्याण : पूर्वेकडील आडवली-ढोकळी परिसरातील जानू सदन येथे राहणाऱ्या जयश्री भोईर या बुधवारी संध्याकाळी ...

Gold chain lampas | सोन्याची चेन लंपास

सोन्याची चेन लंपास

-------------------------------------------

४० हजारांचा मुद्देमाल चोरीला

कल्याण : पूर्वेकडील आडवली-ढोकळी परिसरातील जानू सदन येथे राहणाऱ्या जयश्री भोईर या बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पश्चिमेकडील पुष्पराज हॉटेल ते शिवाजी चौकदरम्यान रस्त्यावर खरेदी करीत होत्या. त्यावेळी त्यांची पिशवी फाडून आतील पर्समधील मोबाइल, रोकड आणि दागिने असा ३९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल अनोळखी आरोपीने चोरला. या प्रकरणी भोईर यांनी दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------------------------

कारटेपची चोरी

कल्याण : प्रकाश मोरमारे यांनी पश्चिमेकडील खडकपाडा सर्कल परिसरातील त्यांच्या साईराम वाटिका सोसायटीत पार्क केलेल्या कारच्या डाव्या दरवाजाची काच फोडून कारटेप चोरून नेल्याची घटना सोमवार ते बुधवारदरम्यान घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोरमारे यांनी तक्रार दिली असून, त्यावरून गुन्हा नोंद झाला आहे.

-----------------------------------------

मोबाइल चोरीला

डोंबिवली : राम यादव हे बुधवारी एमआयडीसी रोडवरील मिलापनगर परिसरात बुधवारी सकाळी ८.३० ला फेरफटका मारत असताना, मागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून पलायन केले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------

२६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला

डोंबिवली: पूनम चौहान या रात्री अडीच ते पाच दरम्यान झोपेत असताना चोरट्याने, त्यांच्या घराची कडी तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातील सोन्याची चेन, रोकड आणि मोबाइल असा २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना पूर्वेकडील आयरेगाव परिसरातील सप्तश्रृंगी मंदिराजवळ मंगळवारी घडली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

-----------------------

Web Title: Gold chain lampas