गोडसे यांचे स्मारक उभारणार नाही

By Admin | Updated: May 22, 2017 03:45 IST2017-05-22T03:45:37+5:302017-05-22T03:45:37+5:30

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद जोशी यांनी, कल्याणपासून सहा किलोमीटरवर असलेल्या सापड गावात नथुराम गोडसे यांचे स्मारक बांधणार असल्याचे शनिवारी जाहीर केले

Godse's memorial will not be raised | गोडसे यांचे स्मारक उभारणार नाही

गोडसे यांचे स्मारक उभारणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रमोद जोशी यांनी, कल्याणपासून सहा किलोमीटरवर असलेल्या सापड गावात नथुराम गोडसे यांचे स्मारक बांधणार असल्याचे शनिवारी जाहीर केले होते. त्याबाबतची बातमी वृत्तपत्रांमध्ये रविवारी प्रकाशित होताच, सकाळी सापाड येथे सापाड-कोलीवली-उंबार्डे गावचे तलाठी सुभाष ढोणे यांनी जोशी यांची भेट घेतली. मात्र, जोशींनी घूमजाव करत, स्मारकासाठी कोणतीही जागा घेतलेली नाही. माध्यमांनी चुकीची बातमी दिल्याचे ढोणे यांना सांगितले.
गोडसे यांचे स्मारक उभारण्यासाठी कोणती जागा घेतली, त्याचा सर्व्हे नंबर काय, आदी माहिती ढोणे यांनी जोशी यांना विचारली. त्यावर कोणतीही जागा घेतलेली नाही. गोडसे यांचे स्मारक होणार नाही, असे त्यांना सांगितले. तहसीलदार किरण सुरवसे यांनीही ढोणे तेथे भेट द्यायला गेल्याचे सांगितले, पण त्यांना मिळालेल्या माहितीनुसार तेथे स्मारक होणार नाही, असे स्पष्ट केले. दरम्यान, ‘लोकमत’ने जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title: Godse's memorial will not be raised