शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

ग्लोबल इम्पॅक्ट हबचा खर्च पाच कोटींनी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 3:08 AM

दहा कोटींची निविदा काढली; वाढीव खर्चास मान्यताच नाही

ठाणे : ठाणे महापालिकेतील प्रकल्पांच्या घोळांची मालिका काही केल्या संपत नसल्याची आणखी एक बाब समोर आली आहे. स्मार्ट सिटी मिशन योजनेच्या अंतर्गत ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारण्यासाठी महासभेची ५ कोटींची मंजुरी असतांना प्रत्यक्षात मात्र या कामाची १० कोटींची निविदा काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अचानक हा खर्च ५ कोटींनी वाढला कसा असा सवाल करण्यात येत असून लोकप्रतिनिधी आता याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहरात ग्लोबल इम्पॅक्ट हब उभारण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून महापालिका शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे व त्याद्वारे शहराचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.ठाणे महापालिकेस रुस्तमजी गृहसंकुलात साकेत बाळकूम रस्त्यावर टाउन सेंटर इमारत बांधीव सुविधेच्या स्वरु पात उपलब्ध झाली आहे. ती ग्लोबल इम्पॅक्ट हबसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे पालिकेने प्रस्तावित केले आहे. या हबमधून नवीन व्यवसाय संकल्पना तयार करण्यासाठी नागरिक, युवक, महिला यांना मार्गदर्शन, नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी तांत्रिक, आर्थिक मदत व मार्गदर्शन, व्यवसायात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आदींसह इतर कामे केली जाणार आहेत.सुधारित मान्यता न घेताच निविदाया प्रकल्पाचा कालावधी हा ३० वर्षे इतका असणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला २८ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या महासभेत मंजुरी मिळाली आहे. यासाठी ५ कोटींचा खर्च अपेक्षित धरला होता. त्यानुसार यामध्ये ग्लोबल इम्पॅक्ट हबकरिता व्यावसायिक आराखडा तयार करणे प्रस्तावित केले असून हबची स्थापना तसेच दोन वर्षांच्या कालावधीत परिचलन करण्यासाठी कुशल व्यावसायिक - तांत्रिक मनुष्यबळ व सेवा पुरवणे आदी कामांचा समावेश आहे. मात्र, सुरु वातीच्या प्रस्तावावर महासभेची ५ कोटींची मंजुरी असताना सुधारीत मंजुरी न घेताच ५ कोटींऐवजी १० कोटींची निविदा काढल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका