शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बारसाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने अभियंत्याला दिली दारुची बाटली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 15:36 IST

रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या गुरु नामक बारला तेथीलच एसटीच्या इमारतीत बार सुरु करण्यासाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने पालिकेच्या अभियंत्याला दारुची बाटली भेट दिली.

भाईंदर  - मीरा-भार्इंदर महापालिकेने रस्ता रुंदीकरणात बाधित ठरलेल्या गुरु नामक बारला तेथीलच एसटीच्या इमारतीत बार सुरु करण्यासाठी पर्यायी जागा दिल्याने शिवसेनेच्या महिला आघाडीने पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक खांबित यांना थेट दारुची बाटली भेट देत सोमवारी पालिकेच्या मनमानी कारभाराविरोधात मुख्यालयात निषेध व्यक्त केला. 

यावेळी सेनेच्या नगरसेविका निलम ढवण, तारा घरत, दिप्ती भट, हेलन जॉर्जी, भावना भोईर, कुसुम गुप्ता, अर्चना कदम, महिला जिल्हा संघटक स्रेहल कल्सारिया आदी महिला उपस्थित होत्या. या महिला आघाडीने पालिकेवर मनमानी कारभाराचा आरोप करीत त्याच तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. पालिकेने सार्वजनिक जागेचा कोणताही सारासार विचार न करता, पालिकेची मालमत्ता म्हणजे आपली खाजगी मालमत्ता समजून उत्पन्न वाढीच्या नावाखाली  एसटीच्या इमारतीत बारला परवानगी देउन तळीरामाच्या पिण्याची सोय केल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनाची कल्पना महिला आघाडीने काही समर्थकांखेरीज पत्रकार व अधिकाऱ्यांना दिली नव्हती.

परंतु, त्याची कुणकूण पत्रकारांसह अधिकाय््राांना लागल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह काही वरीष्ठ अधिकारी मुख्यालयात फिरकलेच नाहीत. मात्र सकाळी ११ वाजता पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी आपल्या दालनात हजेरी लावल्याने सेनेच्या महिला आघाडीने त्यांच्या दालनात प्रवेश करून यांना दारुने भरलेली बाटली देत प्रशासनाचा निषेध केला. ज्यांनी देशी, गावठी, कुजलेल्या द्राक्षाची, मोहाची, विदेशी, अशा सर्व प्रकारची दारू ढोसलेली असेल अशांनाच उत्पन्न वाढीची अशी भन्नाट कल्पना सुचू शकते, असा टोला त्यांनी खांबित यांना लगावला.

पालिका उत्पन्न वाढीसाठी यापुढेही आपल्या मालकीच्या वास्तूंत केवळ बार नाही तर डान्स बार सुरू करायला प्रशासन मागे-पुढे पाहणार नसल्याचा दावाही त्यांना केला. अशा दळभद्र कारभाराचा रट्टा गिरविणाय््राांना पालिका सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, असा प्रश्नही उपस्थित केला. त्या गुरु बारला पालिकेच्याच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांनी एसटीच्या इमारतीत पर्यायी जागा लेखी स्वरुपात दिल्याने जनमाणसांत पालिकेसह लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन झाली असुन त्याची चाड मात्र प्रशासन व सत्ताधाय््राांना नसल्याचा आरोप महिला आघाडीने केला. तसेच याप्रकरणी जबाबदार अधिकाय््राांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचा इशारा दिला. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरShiv Senaशिवसेना