मुंब्य्रात ३० लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत, रेल्वे स्थानकाजवळील दत्तवाडी परिसरात केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:06 IST2017-10-23T02:06:15+5:302017-10-23T02:06:35+5:30
साडेअकरा महिन्यांपूर्वी चलनातून बाद केलेल्या २९ लाख ९० हजारांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी नुकत्याच ताब्यात घेतल्या. या जुन्या नोटा घेऊन एक जण मुंब्य्रात येणार असल्याची माहिती गस्तीवरील पोलीस पथकाला मिळाली.

मुंब्य्रात ३० लाखांच्या जुन्या नोटा हस्तगत, रेल्वे स्थानकाजवळील दत्तवाडी परिसरात केली कारवाई
मुंब्रा : साडेअकरा महिन्यांपूर्वी चलनातून बाद केलेल्या २९ लाख ९० हजारांच्या जुन्या नोटा मुंब्रा पोलिसांनी नुकत्याच ताब्यात घेतल्या.
या जुन्या नोटा घेऊन एक जण मुंब्य्रात येणार असल्याची माहिती गस्तीवरील पोलीस पथकाला मिळाली. त्यानुसार येथील रेल्वे स्थानकाजवळील दत्तवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचला.
संशयास्पद रीतीने वावरत असलेल्या भिवंडीतील प्रशांत पाटील (२८) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५०० रुपयांच्या ४,९२४ आणि एक हजार रुपयांच्या ५२८ जुन्या नोटा आढळल्या. गेल्या पाच महिन्यांत मुंब्रा पोलिसांनी तब्बल दोन कोटींच्या जुन्या नोटा ताब्यात घेतल्या आहेत.