शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख, नोकरी द्या; मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:25 IST

मॅनहोलमध्ये कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी एमआयडीसीवर धडक

डोंबिवली : खंबाळपाडा येथे मॅनहोलमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडलेल्या तीन कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, या मागणीसाठी सोमवारी एमआयडीसीच्या कार्यालयावर डोंबिवली शहर मनसेने धडक दिली. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदनही दिले.मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनसेने कार्यकारी अभियंता ननावरे यांची भेट घेतली. हे तिघे ज्या मॅनहोलच्या सफाईसाठी उतरले, तेथे सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नसल्याची बाब उघड झाली आहे. अभियांत्रिकी कार्यवाहीत नमूद असलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करण्यात एमआयडीसी प्रशासन असमर्थ ठरल्याचा आरोपही यावेळी मनसेने केला.मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची भरपाई द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबीयांपैकी एकाला नोकरीत सामावून घ्यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी शिष्टमंडळाने केल्या.या सर्व मागण्यांची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सविस्तर अहवाल द्यावा. ही कार्यवाही दिवाळीपूर्वी न केल्यास ऐन दिवाळीत एमआयडीसीविरोधात मनसेस्टाइल आंदोलन केले जाईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला. दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे कार्यकारी अभियंता ननावरे यांनी शिष्टमंडळाला सांगितले.एमआयडीसीविरोधातही गुन्हा नोंदवण्याची केली मागणीसफाई कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षेची कोणतीही सुविधा पुरवण्यात न आल्याने या घटनेला एमआयडीसी प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे कंत्राटदाराबरोबरच एमआयडीसी प्रशासनावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमिक जनता संघाचे चिटणीस जगदीश खैरालिया यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.तसेच डेÑनेज, मॅनहोलमध्ये काम करताना सफाई कामगाराचा मृत्यू झाल्यास कामगाराच्या कुटुंबीयांना तत्काळ १० लाख रुपये सरकारने द्यावे. त्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, असे निर्देश मार्च २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचे तंतोतंत पालन करावे, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणेMIDCएमआयडीसी