शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

उल्हासनगरात जीआयएस मॅपिंग डाटाबेस सर्वेक्षण: महापालिकेचा महाराष्ट्र रिमोट सेन्सिन सेंटर सोबत करारनामा

By सदानंद नाईक | Updated: January 17, 2024 20:00 IST

उल्हासनगरच्या विकास आराखड्यात दर्शविलेले रस्ते, आरक्षणे विकसित करतांना सुक्ष्म पद्धतीने विकास योजनेचे वाचन करता येत नाही. त्यामुळे सुखसुविधा देतांना महापालिकेला विविध अडचणीला सामोरे जावे लागते.

उल्हासनगर : शहरातील जीआयएस मॅपिंग डाटाबेस सर्वेक्षण तयार करण्यासाठी महापालिका व राज्य शासनाच्या महाराष्ट्र रिमोट सेसिंग सेंटर विभाग यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. त्यामुळे मंजूर विकास आराखड्यानुसार विकास योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. 

उल्हासनगरच्या विकास आराखड्यात दर्शविलेले रस्ते, आरक्षणे विकसित करतांना सुक्ष्म पद्धतीने विकास योजनेचे वाचन करता येत नाही. त्यामुळे सुखसुविधा देतांना महापालिकेला विविध अडचणीला सामोरे जावे लागते. त्यासाठी सुक्ष्म प्रध्दतीने जीआयएस डाटाबेस तयार करणे आवश्यक असल्याने, सहाय्यक संचालक नगररचनाकार ललित खोब्रागडे व नगररचना विभागाने पुढाकार घेवून महाराष्ट्र रिमोट सेन्सिन सेंटर यांच्या सोबत सामंजस्य करार केला आहे. हा करार करताना महानगरपालिका आयुक्त अजीज शेख, सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागड व सेंटरचे सायंटिस्ट डॉ.आनंद शाक्य उपस्थित होते. या करारान्वये ड्रोन सर्वेक्षण करुन सुक्ष्म प्रध्दतीने संपूर्ण शहराचा डाटाबेस तयार करण्यात येईल, तसेच अनधिकृत बांधकामे नियमित करणेकरीता ज्या अडचणी येतात. त्या दुर करण्यासाठी १ जानेवारी २००५ रोजीचे सॅटेलाईट इमेज प्राप्त करुन, त्याद्वारे नियमितीकरण करणे सोईचे होणार आहे. या सर्वेक्षणाचा शहरवासीयांना फायदा नागरिकांना होणार आहे. 

साडे तेरा चौ.मी. क्षेत्रामध्ये वसलेल्या उल्हासनगरची लोकसंख्या सन-२००५ च्या जनगणनेनुसार ५ लाख ६ हजाराच्या पेक्षा जास्त होती. शहरात बहुतांश घरोघरी लघुउद्योग असल्याने, इतर शहराच्या तुलनेत शहराचे दरडोई उत्पन्न। जास्त असून जीवनमान उंचविण्याकरीता पुरेसा आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, विद्युत, सिव्हरेज लाईन, गटर लाईन, सेप्टीक टँक, सिव्हरेज ट्रिटमेंट प्लांट, वॉटर ट्रिटमेंट प्लॉट, आय.टी.सुविधा इत्यादी अद्यावत करण्यासाठी जीआयएस मॅपिंग डाटाबेस सर्वेक्षणचे महत्वाचे योगदान मिळणार आहे. येत्या काळात महापालिका विकासकामात हमखास आगेकूच करणार असल्याचा विश्वास आयुक्त अजीज शेख,सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांनी व्यक्त केला आहे.

 चौकट मालमत्ता सर्वेक्षणावर कोट्यवधीचा खर्च महापालिकेने शहरातील मालमत्ता सर्वेक्षण करण्यासाठी एका कंपनीला यापूर्वीच ठेका देऊन कोट्यवधींचा खर्च केला. मालमत्ता सर्वेक्षणानंतर महापालिकेला ५० कोटीचा दरवर्षी फायदा होणार असल्याचा दावा कंपनीने व महापालिका प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात मालमत्तेच्या संख्येत वाढ होऊनही महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली नाही. मात्र सर्वेक्षण पोटी महापाकिकेने कंपनीला कोट्यवधी रुपये दिले असून कंपनीसह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे.