शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

झोका घेताना गळफास लागून मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 07:47 IST

घरात असलेली वर्षा ही शेजारच्या मैत्रिणीसाेबत दरवाजात साडी बांधून त्यावर झोका घेत हाेती.

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : आई-वडील मजुरीच्या कामावर गेले असताना घरातील मुले साडीचा झोका बनवून खेळत हाेती. मात्र, झोका घेताना त्या साडीचा गळफास लागून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील भादवड पुंडलिकनगर येथे रविवारी घडली. वर्षा श्रीजन गौतम असे मृत मुलीचे नाव आहे.वडील श्रीजन गौतम व त्याची पत्नी हे दाेघे सोनाळे येथे मोलमजुरीसाठी गेले हाेते. त्यामुळे माेठी मुलगी वर्षा हिच्यावर तिच्या पाच वर्षांचा भाऊ आणि दहा महिन्यांच्या बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी हाेती.

घरात असलेली वर्षा ही शेजारच्या मैत्रिणीसाेबत दरवाजात साडी बांधून त्यावर झोका घेत हाेती. खेळता-खेळता तिने झोक्याला पीळ देत गिरकी घेताच साडीचा फास वर्षाच्या गळ्याभोवती घट्ट बसल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

लहान मुलांना घरात ठेवून कामासाठी बाहेर जात असतील तर त्यांनी मुले घरात काय खेळ खेळतात, याकडे लक्ष द्यावे. अन्यथा अशा प्रकारे दुर्घटना हाेऊ शकतात, असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी केले. सामाजिक संस्थांनी आई-वडिलांसह लहान बालकांचे समुपदेशन करण्याची गरजही व्यक्त केली.

टॅग्स :Deathमृत्यूbhiwandiभिवंडी