धमक्या देऊन मैत्रिणीवर बलात्कार

By Admin | Updated: June 1, 2017 04:53 IST2017-06-01T04:53:15+5:302017-06-01T04:53:15+5:30

एकोणीस वर्षीय मैत्रिणीला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिने नकार देताच तिचा सतत पाठलाग तसेच तिला

Girlfriend raped by threatening | धमक्या देऊन मैत्रिणीवर बलात्कार

धमक्या देऊन मैत्रिणीवर बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : एकोणीस वर्षीय मैत्रिणीला धमकावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि तिने नकार देताच तिचा सतत पाठलाग तसेच तिला मारहाण करून छळणाऱ्या इंद्रेश हरिशंकर पांडे (२४, रा. नायगाव, वसई) याला नयानगर पोलिसांनी अटक केली.
मीरा रोडच्या नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या या तरुणीची तीन वर्षांपूर्वी महाविद्यालयात असतानाच आरोपीशी ओळख झाली. आरोपीने आधी मैत्री आणि नंतर दमदाटी करत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पांडेच्या शोषणाला कंटाळून तरुणीने त्याला टाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो मीरा रोड येथे येऊन तिचा पाठलाग करणे, तिच्याशी वाद घालून मारहाण करणे, तिला धमकावणे आदी प्रकार सुरू केले.
त्याच्यापासून सुटका व्हावी, यााठी अखेर तिने आपल्या कुटुंबीयांना पांडेबद्दल सांगितले. कुटुंबीयांसह सहकाऱ्यांसोबत तिने नयानगर पोलीस ठाणे गाठले.
वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या निर्देशानंतर पोलिसांनी तरुणीच्या फिर्यादीनुसार विनयभंग, धमकावणे आदीप्रकरणी गुन्हा दाखल करून त्वरित आरोपी पांडेला नायगाव येथील त्याच्या घरातून अटक केली.

त्रास झाला असह्य

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून अखेर तिने पोलिसांत तक्रार केली. भीतीमुळे आपल्यावर बलात्कारही पांडेने केल्याची माहिती तिने नंतर दिली. पोलिसांनी पीडित तरुणीचे म्हणणे पुन्हा नोंदवून पांडेवर बलात्काराचा गुन्हासुद्धा दाखल केला आहे.

Web Title: Girlfriend raped by threatening