प्रेयसीवर बलात्कार करणारा अटकेत
By Admin | Updated: February 4, 2016 02:05 IST2016-02-04T02:05:02+5:302016-02-04T02:05:02+5:30
प्रेयसीचे अपहरण करून कळंब येथील रिसॉर्टमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी एका मुलाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.

प्रेयसीवर बलात्कार करणारा अटकेत
वसई : प्रेयसीचे अपहरण करून कळंब येथील रिसॉर्टमध्ये बलात्कार केल्याप्रकरणी एका मुलाला तुळींज पोलिसांनी अटक केली आहे.
नगीनदास पाडा येथील बाबा नगरमधील एका सोळा वर्षीय मुलाचे तेथील एका चौदा वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. २३ जानेवारीला दुपारी बाराच्या सुमारास मुलाने पिडीत मुलीचे अपहरण केले. त्यानंतर कळंब येथील एका रिसॉर्टमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणाची माहिती मुलीने घरी दिल्यानंतर बुधवारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)