शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हद्द झाली... व्हॉट्सअॅपच्या 'व्यसना'साठी अंबरनाथची तरुणी आई-बाबांना सोडून निघून गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 13:30 IST

आई रागावल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेली होती...

ठाणे - फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप हा आज प्रत्येकाच्या आयुष्याच्या अविभाज्य भाग बनल्याने 'इंटरनेट अ‍ॅडिक्शन'चे प्रमाणही वाढत असल्याचे समोर आलं आहे. अंबरनाथमध्ये  सतत व्हॉट्सअॅप वापरत असल्यावरुन कुटुबींयांनी बोललं म्हणून एका 17 वर्षीय तरुणीने घर सोडल्याची घटना समोर आली आहे. सतत व्हॉट्सअॅप वापरण्यात गुंग असल्यामुळे पालक रागावले होते, पण पालकांचा राग या तरुणींनी मनात धरुन थेट घरातूनच पलायन केले आहे. मात्र एका सतर्क नागरिकामुळं आणि नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अंबरनाथ पोलिसांनी मुलीच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावले. आई रागावल्याने रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे मुलीने सांगितले. पोलिसांनी त्या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. 

एका सहलीवरुन घरी परतल्यानंतर ती व्हॉट्सअपवर ती मित्रमैत्रिणींचे फोटो पाहत होती. त्यामुळे मुलीची आई तिला रागावली. याच रागातून तिने घरातून पलायन केले होते. ही मुलगी नवी मुंबई येथे एका महिलेला भयभीत अवस्थेत आढळली होती. मुलीने आईवडिलांकडे जायचे असल्याचे त्या महिलेला सांगितले. त्या महिलेने या मुलीला नवी मुंबई येथील एपीएमसी पोलिस ठाण्यामध्ये नेले. तेथे पोलिसांनी या मुलीची चौकशी केली असता, ही मुलगी अंबरनाथ येथील राहणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ अंबरनाथ पोलिस ठाण्याशी संपर्क करत माहिती दिली आणि अंबरनाथ पोलिसांकडे तिला सुरक्षित सोपवले होते. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपambernathअंबरनाथ