शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
2
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
3
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
4
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
5
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
6
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
7
भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
8
सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
9
Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
10
भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
11
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
12
Winter Recipe: हाय-प्रोटिन 'बाजरी मुंगलेट': थंडीत वजन कमी करण्यासाठी आणि नाश्त्यासाठी सर्वोत्तम पौष्टिक रेसिपी!
13
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
14
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
15
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
16
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
17
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
18
धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
19
फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
20
Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीमुळे घोडबंदर रस्ता दुरुस्ती रखडली; अवजड वाहनांना प्रवेशबंदीचा बार ठरला 'फुसका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:35 IST

रस्ता दुरुस्तीचे कामदेखील अपूर्णच राहिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मिरारोड: घोडबंदर मार्गावर काजू पाडा खिंड ते वरसावे नाका या दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २३ नोव्हेंबरला अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी घालण्यात आल्याची अधिसूचना पोलिसांनी जारी केली होती. मात्र प्रत्यक्षात ही अधिसूचना फुसका बार ठरली आणि सर्रास अवजड वाहने घोडबंदर मार्गावर आल्याने मोठी वाहतूक कोंडी नागरिकांना सहन करावी लागली. शिवाय रस्ता दुरुस्तीचे कामदेखील अपूर्णच राहिले आहे.

मीरा भाईंदर महापालिकेने ठाण्याकडून वरसावे दिशेने येताना घोडबंदर मार्गावरील काजूपाडा खिंड ते वरसावे नाका रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती व रस्ता मजबुतीकरणची कामे करण्यासाठी रविवार २३ नोव्हेंबरला घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यासाठी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय उपायुक्त अशोक वीरकर यांनी अधिसूचना जारी केली होती. महामार्गावरील शिरसाड फाटा व चिंचोटी मार्गे अवजड वाहने जाण्याचे पर्यायी मार्ग निश्चित झाले होते. प्रत्यक्षात मात्र अवजड वाहन बंदीचे काटेकोर पालन करण्यात वाहतूक पोलीस सपशेल अपयशी ठरले. त्यामुळेच घोडबंदर मार्गावर अवजड वाहने मोठ्या संख्येने आल्याने वाहतूक कोंडी झाली.

घोडबंदर मार्गावर काजूपाडा खिंड येथून दोन्ही बाजूने २०-२५ मिनिटांनी वाहने सोडली जात होती. अवजड वाहनां मुळे कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घोडबंदर मार्गावर वाहतूक पोलीस निरीक्षक सागर इंगोले, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर जगताप सह अन्य अधिकारी व वाहतूक पोलिसांनी वाहतूकीचे नियोजन केले. तर काजूपाडा खिंड ते वरसावे नाका पर्यंतच्या आणि वरसावे नाका ते चेणे पूल पर्यंतच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती महापालिके कडून केली जाणार होती. परंतु प्रत्यक्षात मात्र काजूपाडा खिंड पासून चेणेगाव सिग्नल पर्यंतच्या रस्त्याचीच दुरुस्ती केली गेली आहे.

ग्राऊटींग करून मास्टिक अस्फाल्ट केले गेले असून काजूपाडा सिग्नल येथे रॅपिड हार्डनिंग काँक्रीट चे काम केले गेले. मोठे ४ ठिकाणी तर २ ठिकाणी लहान पॅचवर्क केले गेले. शनिवारच्या मध्यरात्री नंतर पालिकेने शहर अभियंता दिपक खांबित यांच्या मार्गदर्शनाखाली कामास सुरवात केली होती. कार्यकारी अभियंता नितीन मुकणे, शाखा अभियंता प्रफुल्ल वानखेडे आदी रात्री पासून सकाळ पर्यंत उपस्थित होते. सायंकाळी ४ -५ दरम्यान काम पूर्ण झाले असले तरी ते सुकण्यासाठी काही तास लागणार असल्याचे पालिके कडून सांगण्यात आले. तर उर्वरित रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा एका मार्गिकेवर वाहतूक बंद ठेवण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ghodbandar road repair stalled by traffic; vehicle ban ineffective.

Web Summary : Heavy vehicle ban failed, causing traffic jams and incomplete road repairs on Ghodbandar road. The municipality repaired some sections, but further closures are needed. Traffic police struggled to enforce the ban.
टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडी