शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पुन्हा एलआरटीचा घाट; अंतर्गत मेट्रो गुंडाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 00:59 IST

ठामपाची होणार पाच हजार ९३० कोटींची बचत

n    लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : आधी एलआरटी त्यानंतर पुन्हा मेट्रो आणि आता पुन्हा मेट्रोचा खर्च अधिक असल्याचा साक्षात्कार उशिराने पालिकेला झाला आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसलेल्या आणि पुरेशी प्रवासी संख्या नसल्याने केंद्राच्या सूचनेनंतर अंतर्गत मेट्रोचा प्रकल्प महापालिकेने गुंडाळला आहे, परंतु या कामासाठी नेमलेल्या सल्लागारावर कोट्यवधींची उधळपट्टीही वाया गेली आहे. त्यानंतर, आता याच मार्गावर एलआरटी (लाइट रेल ट्रान्झिस्ट)चा प्रकल्प पुढे आणला आहे. यासाठी सात हजार १६५ कोटींचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, याबाबतचा प्रस्ताव १८ डिसेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.अंतर्गत मेट्रोऐवजी हा पर्याय निश्चित केल्याने तब्बल ५ हजार ९३० कोटींची बचत होणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांच्या काळात एलआरटीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, त्यानंतर आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांनी एलआरटीऐवजी कोट्यवधींचा खर्च करून अंतर्गत मेट्रोचा प्रस्ताव तयार केला होता. ठाण्यातून मुख्य मेट्रो लाइन ही हायवेवरून जाणार असल्याने या मुख्य मेट्रोपर्यंत प्रवाशांना जाता यावे, यासाठी महापालिकेने अंतर्गत मेट्रोचे प्लॅनिंग केले होते. त्यानुसार, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्याला महासभेची मान्यता घेतल्यानंतर, तो राज्य शासन आणि पुढे केंद्राच्या मान्यतेसाठी पाठविला होता, परंतु केंद्राने हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे सांगून त्याऐवजी व्यवहार्य ठरेल, असा दुसरा पर्याय पुढे आणावा, अशा सूचना केल्या. त्यानुसार, महापालिकेने पुन्हा महामेट्रोच्या मदतीने एलआरटीचा पर्याय पुढे आणला आहे.असे केले जाणार नियोजनपूर्वी प्रस्तावित केलेल्या मेट्रोच्या अलाइनमेंटमध्ये बदल न करता पूर्वीच्याच डीपीआरमध्ये सुचवल्याप्रमाणे अलाइनमेंट कायम ठेवून अंतर्गत मेट्रोच्या ऐवजी एलआरटी प्रकल्प राबविण्याबाबत महामेट्रोचा अहवाल मार्च २०२० मध्ये मिळाला. अंतर्गत भूसंपादन आणि पुनर्वसनाचे काम महापालिका करणार असून आणि मेट्रो लाइनची जास्त अलाइनमेंट ही डीपी रोडवर असल्याने भूसंपादन व पुनर्वसनाचा एक हजार ५२७ कोटींचा खर्चाचा बोजा थेट या प्रकल्पावर पडणार नसल्याने ही या प्रकल्पाची जमेची बाजू आहे. यासंदर्भातील प्रस्ताव ठाणे महापालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला असून लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एलआरटीमध्ये २२ स्थानकांचा समावेशमेट्रोप्रमाणे एलआरटीदेखील सुरुवातीचे तीन किमी भूमिगत व पुढे एलिव्हेटेड पद्धतीने धावणार आहे. २९ किमीचा मार्ग असणार असून यामध्ये २२ स्थानके असणार आहेत. तर, एका वेळेस ५०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता यामध्ये असणार असून याचा वेग मेट्रोपेक्षा २० टक्के कमी असणार असून ठाणेकरांना सुखकर प्रवासाची हमी दिली जाणार आहे. अंतर्गत मेट्रोसाठी सुमारे १३ हजार कोटी ९५ लाखांचा खर्च अपेक्षित होता. परंतु, आता एलआरटीसाठी तो सात हजार ९३० कोटींपर्यंतच असल्याने तब्बल ५ हजार ९३० कोटींची बचत होणार आहे.