शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

सिनेसृष्टीला जीएसटीच्या जाचातून सोडवा - अभिनेते मंगेश देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 06:47 IST

१८ टक्के जीएसटी लागल्याने मराठी चित्रपटांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीच्या अनेक जाचक अटी बदलल्या. फेररचना झाली, पण चित्रपटसृष्टीवरील

अंबरनाथ : १८ टक्के जीएसटी लागल्याने मराठी चित्रपटांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात जीएसटीच्या अनेक जाचक अटी बदलल्या. फेररचना झाली, पण चित्रपटसृष्टीवरील जीएसटी कमी झाला नाही. तो शासनाने कमी करावा, असे आवाहन अभिनेते मंगेश देसाई यांनी रविवारी संध्याकाळी अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ््यात केले.अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे आयोजित तिसºया अंबरनाथ चित्रपट महोत्सवातील पारितोषिक वितरण सोहळ््याप्रसंगी ते बोलत होते. वेगळे विषय ताकदीने मांडून सध्याच्या मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा ठसा उमटविला असला, तरी अजूनही महाराष्ट्रात सिनेमांना थिएटर मिळणे अवघड बनले आहे. अनेक चांगले मराठी चित्रपट केवळ थिएटर मिळत नसल्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यात जीएसटीने अडचणीत वाढ झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.सुप्रसिद्ध सतारवादक भूपाल पणशीकर यांच्या सादरीकरणाने महोत्सवाची सुरूवात झाली. त्यानंतर नर्तक रमेश कोळी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्ये सादर केली.महोत्सवात ‘कॉपी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरविले गेले. खा. डॉ. श्रीकांत शिंदे, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, आ. डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, महेंद्र पाटील, जगदीश हडप, गिरीश पंडित, डॉ. राहुल चौधरी, डॉ. कुणाल चौधरी, अभय शिंदे आदींनी महोत्सवाच्या आयोजनात पुढाकार घेतला.ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तब्येत बरी नसतानाही विजय चव्हाण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी हजर होते. आपल्या मनोगतात त्यांनी समस्त रसिकांचे आभार मानले. दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांना विशेष स्मृती पुरस्कार देण्यात आला.ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. अभिनेते संतोष जुवेकर, सुनील तावडे, अभिनेत्री प्रेमाकिरण, प्रिया गमरे, विशाखा सुभेदार, दिग्दर्शक गिरीश मोहिते, अजित शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.अंबरनाथसारख्या शहरात मराठी चित्रपट महोत्सव भरवून गुणवंतांना पारितोषिके देण्याचा हा उपक्र म स्तुत्य असल्याचे अनेक कलावंतांनी नमूद केले. अमेय रानडे आणि अभिनेत्री इरावती लागू यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :marathiमराठीcinemaसिनेमा