शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
4
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
5
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
6
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
7
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
8
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
9
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
10
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
11
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
12
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
13
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
14
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
15
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
16
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
17
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
18
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
19
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
20
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान

कोरोनाबरोबरच विकासकामांच्या चर्चेसाठी महासभा घ्यावी- नारायण पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 19:19 IST

महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली मागणी

ठाणे: कोरोनाबरोबरच ठाणो शहरातील विकासकामांच्या चर्चेसाठी तातडीने महासभा घ्यावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याकडे केली आहे.‘कोरोना’ च्या संसर्गामुळे दरमहा होणा:या महासभा, स्थायी समिती आणि समितीच्या सभा होऊ शकलेल्या नाहीत. महापालिकेतील जनसामान्यांचा आवाज उमटणारी महासभा मार्च महिन्यापासून झालेली नाही. त्यामुळे नगरसेवकांना महापालिका प्रशासनाकडे सामान्यांचे प्रश्न मांडताना मोठया अडचणी येत आहेत.

बहुसंख्य नगरसेवकांकडून प्रशासनाला ई-मेलद्वारे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जातो. मात्र, पाठविलेल्या ई-मेलची साधी दखलही घेतली जात नाही. तर पत्रंना अगदी उत्तरे देण्याचे सौजन्यही दाखविले जात नाही, हे दुर्देव आहे, असेही नगरसेवक पवार यांनी महापौर म्हस्के यांना पाठविलेल्या पत्रत म्हटले आहे.

कोरोनाप्रमाणोच नालेसफाईसह शहरातील विकासकामांवर चर्चा होण्याची गरज आहे. आगामी काळात नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मालमत्ता कर-पाणीपट्टी वसूलीतून सवलत देण्याबरोबरच उत्पन्नात लक्षणीय घट झाल्यामुळे उत्पन्नवाढीचे नवे मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत महापालिकेच्या अर्थसंकल्पातील योजनांचाही पुनर्विचार करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

या पाश्र्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान राखत महासभा घेण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी राज्यात पुणो, नागपूर, भिवंडी महापालिकांच्या सर्वसाधारण सभा झाल्या. राज्यातील काही जिल्हा परिषदांकडूनही व्हच्यरूअल  सभा घेण्यात आल्या. काही ठिकाणी निम्मे सदस्य सभागृहात, तर निम्मे सदस्य ऑनलाईनद्वारे कामकाजात सहभागी झाले होते. त्यामुळे ठाणोकरांच्या हिताच्या दृष्टिने महासभा घेण्याबाबत गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी पवार यांनी केली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस