साहित्यप्रेमींत गाजला गझलनवाजांचा नकार!
By Admin | Updated: February 5, 2017 03:15 IST2017-02-05T03:15:32+5:302017-02-05T03:15:32+5:30
साहित्य संमेलन परिसरात ‘कवी कट्टा’अंतर्गत ‘गझल कट्टा’ही झाला. या ‘गझल कट्टा’साठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गझलगायक गझलनवाज भीमराव पांचाळे

साहित्यप्रेमींत गाजला गझलनवाजांचा नकार!
पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली) : साहित्य संमेलन परिसरात ‘कवी कट्टा’अंतर्गत ‘गझल कट्टा’ही झाला. या ‘गझल कट्टा’साठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गझलगायक गझलनवाज भीमराव पांचाळे यांना निमंत्रण पाठवले होते. मात्र, त्यांनी दिलेला ‘नकार’ साहित्यरसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर हे पत्र फिरल्याने गझलचा सन्मान राखत नसल्याची चर्चा संमेलनात धुमसत होती.
भीमराव पांचाळे यांनी निमंत्रण पाठवल्याबद्दल आभार व्यक्त करत, गझल नावाची अनमोल काव्यविधा मराठी भाषेत रुजवून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करणाऱ्या कविवर्य सुरेश भटा यांच्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ कायम दूरच राहिले. शिवाय, ‘मराठी कवितेवर गझलचे आक्रमण’ असे बोल ऐकावे लागले. आता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापासून दूर, कोपऱ्यात कुठेतरी ‘गझल कट्टा’ नावाचे स्वतंत्र व्यासपीठ (?) आणि तिथे मराठी गझलला मानाचे स्थान..., असे लिहून ‘क्या बात’ म्हणत उपरोधिक टोलाही हाणला आहे. (प्रतिनिधी)