शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

गौरी-गणपतींना दिला भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:12 IST

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सायंकाळी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील

ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...चा जयघोष, ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात गुरुवारी सायंकाळी ठाणे पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील सुमारे १४ हजार माहेरवाशीण गौरार्इंसह गणरायाच्या ४२ हजार मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी कोसळलेल्या पावसाने गुरुवारी पूर्णपणे उसंत घेतल्याने बाप्पाची मिरवणूकही निर्विघ्नपणे काढता आली. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भक्तगणांना अक्षरश: गहिवरुन आले होते.गेले सात दिवस मनोभावे गणरायाची विधिवत पूजा केल्यानंतर गुरुवारी जिल्ह्यात २२१ सार्वजनिकसह ४१ हजार ७५६ श्रींच्या मूर्तींना तर १३ हजार ९४७ गौरार्इंना निरोप देण्यात आला. यावेळी पर्यावरणाभिमुख गणेश विसर्जनासाठी आघाडीवर असणाºया ठाणे महानगरपालिकेने रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजीनिवाडी, बाळकूम, खारेगाव, ब्रह्मांड, गायमुख येथे विशेष कृत्रिम तलावाची निर्मिती केली होती. तर कोपरी, पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत येथे निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन महाघाटाचा भक्तांनी उपयोग करून घेतला. तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्य कलशही उभारण्यात आले होते. वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युत व्यवस्था, ध्वनिक्षेपण यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच विसर्जन घाटांसह शहरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.दुपारी चार वाजल्यापासूनच ठाण्यामधील सार्वजनिकसह अनेक घरगुती गणपती हातगाडी, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून निरोपाला निघालेले पाहायला मिळाले. विसर्जन घाटावर रात्री उशिरापर्यंत बाप्पांचे विसर्जन सुरू होते.परिमंडळ १ -५४३५ घरगुती, ५१ सार्वजनिक, १७०१ गौरींचे, परिमंडळ २ - ४३२० घरगुती, २७ सार्वजनिक, ५४५ गौरींचे, परिमंडळ ३ - १००५० घरगुती, ६४ सार्वजनिक, २७०० गौरींचे, परिमंडळ ४- १३३५५ घरगुती, ३७ सार्वजनिक, ७२३५ गौरार्इं, परिमंडळ ५- ८५९६ घरगुती, ४२ सार्वजनिक आणि १७६६ गौरींचे विसर्जन झाले.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव