अंबरनाथमध्ये सीएनजी स्टेशनवरच गॅसची गळती; सुदैवाने मोठा अनर्थ टकला
By पंकज पाटील | Updated: July 21, 2025 21:37 IST2025-07-21T21:36:34+5:302025-07-21T21:37:12+5:30
Gas leak at CNG station in Ambernath: सीएनजी गॅस सप्लाय करणाऱ्या ट्रक मधूनच मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू झाल्यामुळे अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात आहाकार माजला होता. मात्र सीएनजी स्टेशन वरील कर्मचाऱ्यांनी ही गॅस गळती रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अंबरनाथमध्ये सीएनजी स्टेशनवरच गॅसची गळती; सुदैवाने मोठा अनर्थ टकला
- पंकज पाटील
अंबरनाथ - सीएनजी गॅस सप्लाय करणाऱ्या ट्रक मधूनच मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू झाल्यामुळे अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरात आहाकार माजला होता. मात्र सीएनजी स्टेशन वरील कर्मचाऱ्यांनी ही गॅस गळती रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अंबरनाथ पश्चिमेच्या कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील फॉरेस्ट नाका जवळ सीएनजी पंपावर गॅस गळती झाली. सीएनजी गॅसची वाहतूक करणाऱ्या एका ट्रकवरील सिलेंडरमध्ये गॅस भरतांना ही घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सीएनजी गॅसचे सिलेंडर घेऊन ट्रक इगतपुरी येथे जाणार होता. मात्र अचाकपणे नोझल मधून गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती ट्रक चालकाने दिली आहे. दरम्यान गॅस गळती होताच सीएनजी पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच या गळतीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे राज्य महामार्गावर काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. फॉरेस्ट नाका हा अति महत्त्वाचा चौक असून या चौकातच हा सीएनजी पंप आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजी गॅस भरण्यासाठी येत असतात . अशा ठिकाणी ही गॅस गळती झाल्याने एकच खळबळ उडाली.