- नितिन पंडीतभिवंडी - भिवंडी तालुक्यातील देवरुंग गावात बुधवारी घरातील गॅस सिलेंडर गळती झाल्याने सिलेंडर स्फोट होऊन लागलेल्या आगीत संपूर्ण घर जाळून खाक झाले असून ,घरातील सर्व साहित्यासह मौल्यवान चीजवस्तू जळून खाक झाल्या आहेत .तालुक्यातील देवरुंग गावातील सुरेश गोडे यांच्या घरात ही दुर्घटन घडली आहे . या दुर्घटने नंतर घरातील सर्व सदस्यांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान ग्रामस्थांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात न आल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशामक दलास पाचारण केले त्या नंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले परंतु तो पर्यंत घर पूर्णपणे जळून खाक झाले होते.
भिवंडीत गॅस सिलेंडरच्या स्फोट झाल्याने घराला लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:10 IST