शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं
2
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
3
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
4
"Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती
5
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
6
रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली
7
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला
8
PHOTOS : परदेशात सचिनच्या लेकीचा बोल्ड अवतार; सारा तेंडुलकरचा घायाळ करणारा अंदाज
9
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
10
"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला
11
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
12
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
13
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
14
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
15
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
16
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
17
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
18
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
19
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
20
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग

अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांचा कचरा; संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी

By पंकज पाटील | Published: October 10, 2023 7:37 PM

फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे.

पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात फेरीवाल्यांकडून जप्त केलेला माल तसाच ठेवण्यात आला आहे. जे कार्यालय कर्मचाऱ्यांच्या कामाचे ठिकाण आहे त्याच ठिकाणी फेरीवाल्यांचा कचरा आणून टाकला जात असल्यामुळे संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. अंबरनाथच्या नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये तळमजल्यावर अतिक्रमण विभागाचा कार्यालय ठाण्यात आला आहे. या कार्यालयात अधिकाऱ्यांसह कर्मचारी काम करीत असतात.

अतिक्रमण विभागाने फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर जो माल जप्त केला जातो तो माल ठेवण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्यामुळे संबंधित अधिकारी थेट कार्यालयातच हा सर्व कचरा आणि जप्त केलेला माल तसाच ठेवत आहेत. भाजी आणि फळांच्या टोपल्या देखील याच ठिकाणी ठेवल्या जात असल्यामुळे संपूर्ण कार्यालयात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अतिक्रमण विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन काम करण्याची वेळ आली आहे. नवीन प्रशासकीय इमारत कॉर्पोरेट दर्जाची तयार केलेली असली तरी या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती मात्र अद्यापही बदललेली नाही. फेरीवाल्यांचा जप्त केलेला माल थेट कार्यालयाच्या आत ठेवला जात असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद देण्याची गरज व्यक्त होत आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ