परप्रांतीयांची दादागिरी सुरूच, भाजी विक्रेत्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:48 IST2021-09-04T04:48:32+5:302021-09-04T04:48:32+5:30

डोंबिवली : एका परप्रांतीय फेरीवाल्याने ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, डोंबिवलीत परप्रांतीय भाजीपाला विक्रेत्या ...

The gangsterism of foreigners continues, beating the vegetable seller | परप्रांतीयांची दादागिरी सुरूच, भाजी विक्रेत्याला मारहाण

परप्रांतीयांची दादागिरी सुरूच, भाजी विक्रेत्याला मारहाण

डोंबिवली : एका परप्रांतीय फेरीवाल्याने ठाणे महापालिकेच्या महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, डोंबिवलीत परप्रांतीय भाजीपाला विक्रेत्या कुटुंबाने एका मराठी भाजी विक्रेत्याला जबर मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी पूर्वेकडील भाजी मार्केटमध्ये घडली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील चौघांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मानपाडा परिसरातील गोलवली परिसरात राहणारे कमलाकर पाटील हे पत्नीसह रेल्वे स्थानक परिसरातील भाजी मार्केटच्या एका गल्लीत भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे भाजी विकायला भाजी मार्केटच्या गल्लीतील छेडा दुकानासमोर बसले असताना, जवळच भाजी विकायला बसलेले मल्याली कुटुंब जोरजोरात ओरडून भाजी विक्री करीत होते. त्यावेळी ओरडून भाजी विकू नका, असे कमलाकर यांच्या पत्नीने त्यांना सांगितले असता, परशुराम कांती मल्याली, जयेश मल्याली, सुभाष मल्याली, विष्णू मल्याली यांनी कमलाकर यांना लाथा-बुक्क्यांनी आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. यात कमलाकर यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली आहे.

----------------

Web Title: The gangsterism of foreigners continues, beating the vegetable seller