मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: January 15, 2024 19:06 IST2024-01-15T19:06:07+5:302024-01-15T19:06:29+5:30

कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा: कलम १४२ नुसार कारवाई.

Gangster deported from Mumbai Thane arrested | मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक

ठाणे: मुंबई, ठाण्यासह पाच जिल्हयातून हद्दपार केलेल्या किरण अच्युत भुरे ऊर्फ बाळा (२१, रा. डोंगरीपाडा, ठाणे) या गुंंडाला मोकाट फिरतांना पुन्हा जेरबंद केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी सोमवारी दिली. त्याच्याविरुद्ध १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

डोंगरीपाडा भागात राहणारा गुंड किरण याच्याविरुद्ध हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यासाठी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी त्याला १३ फेब्रुवारी २०२३ रोजी दोन वर्षांसाठी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, पालघर आणि रायगड या पाच जिल्हयांमधून हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, पोलिस आयुक्त किंवा पोलिस उपायुक्त यांची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता तो मनाई आदेशाचा भंग करुन मोकाट फिरत असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या पथकाने १३ जानेवारी २०२४ रोजी सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास डोंगरीपाडा भागातून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार काटकर हे करीत आहेत.

Web Title: Gangster deported from Mumbai Thane arrested

टॅग्स :thaneठाणे