उल्हासनगरात राबविली जाणार आम्ही लोकसेवक संकल्पना, गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशनच्या उपक्रमाने खळबळ
By सदानंद नाईक | Updated: August 15, 2022 17:41 IST2022-08-15T17:41:23+5:302022-08-15T17:41:48+5:30
उल्हासनगर महापालिकेची मुदत एप्रिल महिन्यात संपली असून महापालिका निवडणुकीबाबत निश्चिती नाही. अशा वेळी नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना हक्काचा माणूस हवा आहे.

उल्हासनगरात राबविली जाणार आम्ही लोकसेवक संकल्पना, गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशनच्या उपक्रमाने खळबळ
उल्हासनगर : महापालिकेची मुदत संपल्याने, माजी नगरसेवक झालेल्याचे नागरिकांच्या दैनंदिन समस्याकडे दुर्लक्ष झाले. नागरिकांच्या समस्याला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक प्रभागात आम्ही लोकसेवक संकल्पना गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशन राबविणार असल्याने, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर महापालिकेची मुदत एप्रिल महिन्यात संपली असून महापालिका निवडणुकीबाबत निश्चिती नाही. अशा वेळी नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना हक्काचा माणूस हवा आहे. यातूनच गंगोत्री वेल्फेअर फाऊंडेशने पुढाकार घेतला. फाउंडेशनच्या अध्यक्ष सोनिया धामी कौर यांनीं सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आम्ही लोकसेवक या संकल्पनेची माहिती दिली. माजी नगरसेवक स्थानिक कामे करीत असले तरी सर्वच ठिकाणी तशी परिस्थिती नाही. शहारतील नागरिकांच्या समस्यांना वाचा फुटून, त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही लोकसेवक संकल्पने मार्फत काम करणार असल्याची माहिती धामी यांनी दिली. राजकारण विरहित असलेली ही संघटना नागरिकांत जाऊन काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
शहरातील प्रत्येक प्रभाग व वॉर्डात आम्ही लोकसेवक यांची नियुक्ती करून, ते लोकसेवक परिसरातील समस्यांबाबत पालिका आयुक्त, संबंधित अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. त्या समस्याचे निराकरण विशिष्ठ दिवसात झाले नाही तर, आंदोलना सारखे हत्यार उपसावे लागणार असल्याचेही कौर यांनी सांगितले. आम्ही लोकसेवक संकल्पनेने, माजी नगरसेवाकांसह इच्छुक उमेदवारांच्याही झोपा उडाल्या आहेत. पत्रकार परिषदेला भारत गंगोत्री, माजी नगरसेवक सुनीता बगाडे, राज असरोडकर, विशाल माखिजा, माधव बगाडे यांच्यासह अन्य जणउपस्थित होते.