शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉइल चोरणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:25 IST

शीळ-डायघर भागात कल्याणफाटा येथे कॉपर कॉइलची चोरी करण्यासाठी तिघा जणांचे टोळके येणार असल्याची ‘टीप’ खबऱ्यांकडून डायघर पोलिसांना मिळाली. हीच माहिती मिळाल्यानंतर ४५० किलो वजनाच्या कॉपर कॉइलसह सहा चोरांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली.

ठळक मुद्दे४५० किलोच्या कॉपर कॉइलसह पाच लाख ४० हजारांचा मुद्देमालही जप्तडायघर पोलिसांची कारवाईगेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या चोऱ्या

ठाणे : ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉइल चोरणा-या प्रकाश ऊर्फ धीरज सिंग (२४, रा. शीळफाटा, ठाणे) याच्यासह सहा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या टोळीकडून एक कार आणि ४५० किलो वजनाच्या कॉपर कॉइलसह पाच लाख ४० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कॉपर कॉइलची चोरी करण्यासाठी तिघा जणांचे टोळके येणार असल्याची ‘टीप’ एका खबºयाकडून मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड, संतोष तागड, पोलीस हवालदार प्रकाश शिरसाठ, मारुती कदम, पोलीस नाईक दीपक जाधव, मुकुंद आव्हाड, रतिलाल वसावे, ललितकुमार वाकडे आणि कॉन्स्टेबल धनंजय आहेर आदींच्या पथकाने २१ आॅगस्ट रोजी कल्याणफाटा रोड येथे पहाटे ४.३० वा.च्या सुमारास सापळा लावला होता. त्याचवेळी तिथे आलेल्या एका संशयास्पद कारच्या कागदपत्रांची या पथकाने विचारपूस केली. तेव्हा पोलीस पथकाला पाहून कारमधील टोळके पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्यापैकी प्रकाश सिंग, शशी ऊर्फ राजू ढोले (४०, रा. डोंबिवली), आशीष गुप्ता (२४, रा. डोंबिवली) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या कारच्या झडतीमधून एका बॅगमध्ये कटर, पाने, पककड, करवत आणि इतर सामग्री मिळाली. कसून चौकशीमध्ये त्यांनी या साहित्याच्या ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर कॉइलच्या चोरीसाठी वापर करत असल्याची कबुली दिली. शीळ-डायघर भागात दोन ठिकाणी अशा चोºया केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. अधिक चौकशीमध्ये त्यांनी अभिषेक लाड (२३, रा. डोंबिवली), फरहान शेख (२३, रा. खारघर, नवी मुंबई) आणि मुकेश चौधरी (३९, रा. नवी मुंबई) या अन्य तीन साथीदारांची नावे उघड केली. त्यावेळी कॉइलचोरीचा हा गोरखधंदा उघड झाला. त्यानंतर त्यांचाही ठावठिकाणा शोधून या उर्वरित तिघांनाही २२ आॅगस्ट रोजी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून कॉइलचोरीसाठी लागणारे साहित्य तसेच पाच लाख ४० हजारांची ४५० किलो कॉपर कॉइल हस्तगत केली. त्यांनी अशा प्रकारे कॉपर कॉइलच्या आणखी किती ठिकाणी चोºया केल्या आहेत, याचाही शोध घेण्यात येत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी