शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

खंडणीसह दरोडे टाकणारी नवी मुंबईतील टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 22:35 IST

कळव्यात दरोडे टाकून नवी मुंबई परिसरात खंडणी उकळणाऱ्या अभिषेक सिंग याच्यासह नवी मुंबईतील पाच जणांच्या टोळीला ठाण्याच्या कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध कळव्यात जबरी चोरीचा तर नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे.

ठळक मुद्दे सोनसाखळीसह रोकड हस्तगत कळवा पोलिसांची कामगिरी नगरसेवकाच्या वाहनांचीही केली होती तोडफोड

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दरोडे टाकून खंडणीही उकळणा-या अभिषेक सिंग (२३, ईश्वरनगर, नवी मुंबई) याच्यासह पाच जणांच्या टोळीला कळवा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सोनसाखळी तसेच दोन हजारांची रोकडही हस्तगत केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.कळव्यातील वाघोबानगर येथील रहिवासी चंद्रभान प्रजापती आणि त्यांचे मित्र किशनकुमार राणा हे दोघे वाघोबानगर येथील रस्त्याने ४ डिसेंबर २०१९ रोजी पायी जात होते. त्यावेळी चार जणांच्या एका टोळक्याने या दोघांनाही दगडाने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल आणि रोकड असा ३५ हजारांचा ऐवज जबरीने हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अभिषेक यांच्यासह भरत जाधव (२५, रा. नवी मुंबई), आशुतोष पाटोळे (१९, रा. नवी मुंबई), परमेश्वर पाटोळे (१९, रा. नवी मुंबई) आणि अभिषेक आंबावकर (१९, रा. नवी मुंबई) या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांनी या जबरी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना १० डिसेंबर रोजी अटक केली. त्यांनी जबरीने चोरलेली सोनसाखळी आणि दोन हजारांची रोकडही हस्तगत केली. त्यांनी ४ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील दिघा येथेही सुनीलकुमार दुबे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. ती न दिल्याने त्यांना मारहाण करून त्यांना ठार मारण्याचीही धमकी दिल्याची बाब चौकशीत उघड झाली.* नवी मुंबईच्या नगरसेवकाच्या वाहनांची तोडफोडदिघा परिसरातील स्थानिक नगरसेवक विकास झंजाड आणि इतरांच्या वाहनांचीही त्यांनी तोडफोड केल्याचीही कबुली दिली. त्यांच्याविरुद्ध रबाळे पोलीस ठाण्यात खंडणीचाही गुन्हा दाखल आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक के. पी. थोरात, एस. एस. आजगावकर, उपनिरीक्षक कवळे तसेच पोलीस हवालदार शहाजी एडके, माधव दराडे, दिनकर देसाई, पोलीस नाईक रविंद बिराडे, संदीप महाडीक, रमेश पाटील, राहूल शिरसाठ, पोलीस कॉन्स्टेबल संतोष ढेबे, विकास साठे आणि समाधान माळी आदींनी ही कारवाई यशस्वी केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक